Aries To Pisces Horoscope In Marathi, 22 April 2025 : २२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत राहील. श्रवण नक्षत्र दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरु होईल. रात्री ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…
२२ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 22 April 2025)
मेष दैनिक राशिभविष्य (Aries Dainik Rashi Bhavishya)
कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.
वृषभ दैनिक राशिभविष्य (Taurus Dainik Rashi Bhavishya)
वृषभ राशीच्या लोकांनी कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
मिथुन दैनिक राशिभविष्य (Gemini Dainik Rashi Bhavishya)
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.
कर्क दैनिक राशिभविष्य (Cancer Dainik Rashi Bhavishya)
फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.
सिंह दैनिक राशिभविष्य (Leo Dainik Rashi Bhavishya)
काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल
कन्या दैनिक राशिभविष्य (Virgo Dainik Rashi Bhavishya)
धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.
तूळ दैनिक राशिभविष्य (Libra Dainik Rashi Bhavishya)
जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.
वृश्चिक दैनिक राशिभविष्य (Scorpio Dainik Rashi Bhavishya)
भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनू दैनिक राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya)
बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.
मकर दैनिक राशिभविष्य (Capricorn Dainik Rashi Bhavishya)
मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ दैनिक राशिभविष्य (Aquarius Dainik Rashi Bhavishya)
सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.
मीन दैनिक राशिभविष्य (Pisces Dainik Rashi Bhavishya)
व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd