Today Horoscope in Marathi, 25 April 2025 : २५ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरु होईल. पूर्वा भाद्रपद नक्षत्र सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्र सुरु होईल. दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत इंद्र योग जुळून येईल. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. प्रदोष व्रताचे महत्व शिवपुरणात सांगण्यात आले आहे. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शुक्र प्रदोष व्रत असे म्हणतात. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात.तर मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस काय नवीन घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

२५ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 25 April 2025)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya in Marathi)

बौद्धिक चलाखी दाखवाल. तत्परतेने कामे कराल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत खेळत कामे कराल. चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya in Marathi)

वृषभ राशीच्या लोकांनी जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. प्रवासाचे बेत आखाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. महत्त्वाचे कागदपत्रे तपासून पहावीत. चारचौघांत मिळून मिसळून वागाल.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya in Marathi)

तरुण वर्गाशी मैत्री कराल. अधिकारी वर्गाची मदत मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. क्षणिक सौख्यात रमून जाल.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya in Marathi)

मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल. सर्वांशी आनंदी वृत्तीने वागाल. वातविकाराचा त्रास संभवतो.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya in Marathi)

सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. घरगुती वापराच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. अनपेक्षित लाभणे खुश व्हाल.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Rashi Bhavishya in Marathi)

परोपकाराची जाणीव ठेवाल. वैचारिक दृष्टिकोन सुधाराल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. दिवस मजेत जाईल. प्रकृतीची हेळसांड करू नका.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Rashi Bhavishya in Marathi)

जुन्या कामातून लाभ संभवतो. कामे वेळेत पार पडतील. मानसिक द्विधावस्था टाळावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Rashi Bhavishya in Marathi)

प्रवासात सावधानता बाळगावी. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल. आशावादी दृष्टिकोन वाढीस लागेल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Rashi Bhavishya in Marathi)

सामाजिक कार्यात भाग घ्याल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. स्वत:चा मान राखून वागणे ठेवाल. उपासनेला बळ मिळेल. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Rashi Bhavishya in Marathi)

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमप्रकरणातील घनिष्टता वाढेल.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Rashi Bhavishya in Marathi)

आततायीपणे निर्णय घेऊ नका. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. मनातील नैराश्य बाजूस सारावे. प्रवासाचा योग येईल.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Rashi Bhavishya in Marathi)

आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. हसत खेळत कामे साधून घ्याल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य वाढेल. व्यावसायिक लाभणे खुश व्हाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर