Rashi Bhavishya in Marathi, 27 April 2025 : २७ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या आहे. अमावस्या रविवारी रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत राहील. अश्विनी नक्षत्र रात्री १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत जागृत असेल. रात्री १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत प्रीति योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच वैशाख महिन्यातील अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून ओळखले जाते. सूर्याला रविवारचा स्वामी ग्रह मानले जाते. म्हणून, रविवार आणि अमावस्येच्या दिवशी दिवसाची सुरुवात सूर्यपूजेने करावी. तर दर्श अमावस्या तुमच्या राशीसाठी सुख घेऊन येणार की दुःख? जाणून घेऊया…
२७ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya in Marathi, 27 April 2025)
मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
मेष राशीच्या व्यक्ती गप्पांमध्ये रंगून जातील. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल.
मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा. काटकसरीने वागाल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. चांगली संगत लाभेल.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात. सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.
कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे. नवीन मित्र जोडावेत. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
स्त्री वर्गापासून जपून राहावे. कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर