Daily Horoscope in Marathi : ११ एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी रात्री ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत चालेल. संध्याकाळी ७वाजून ४५ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत जागृत असेल. याशिवाय, महावीर जयंती देखील १० एप्रिल रोजी आहे. आज राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आजचा दिवस मेष ते मीन राशीचा कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…
११ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
अति विचार करणे टाळावे लागेल. कामाचा बोजा वाढल्याने थकवा जाणवेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
कामात चिकाटी ठेवावी लागेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्याल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
अधिकारी व्यक्तींचा सल्ला मिळेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
वडीलधार्यांचा योग्य मान ठेवाल. मनातील अकारण आलेली भीती काढून टाकावी. लहान-सहान गोष्टींनी नाराज होऊ नका. अति विचाराने मानसिक तान येऊ शकतो. छंदासाठी वेळ द्यावा.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
भागीदाराशी सलोखा वाढेल. नवीन व्यावसायिक धोरण ठरवाल. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा होतील. सहकुटुंब जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
जोडीदाराची आवक वाढेल. कौटुंबिक शांतता जपावी. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. कफ विकारांपासून काळजी घ्यावी.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून उचलावीत.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
सामाजिक बांधीलकी जपाल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडी बाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. बाग-बगीच्याच्या कामात मन गुंतवाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
सर्वांशी लाडिकपणे बोलाल. आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर