Horoscope Today, 13 April 2025 : १३ एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज चित्रा नक्षत्र आणि हर्षण योग यांचे संयोजन दिसेल. चित्रा नक्षत्र रात्री ९ वाजून १० मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर हर्षण योग रात्री ९ वाजून ३८ मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज अभिजात मुहूर्त सकाळी ११ वजवून ५६ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल. आज राहू काळ ४ वाजता सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा आठवड्याच्या शेवटचा दिवस कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१३ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Horoscope Today in Marathi) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाई साठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमच्या सामाजिक दर्जा सुधारेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily rashi bhavishya in marathi how will sunday go for people of aries to pisces according to the panchang asp