Darsh Amavasya Vishesh Horoscope : २९ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथी संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत राहील. रात्री १० वाजून ३ मिनिटांपर्यंत पर्यंत ब्रह्मयोग जुळून येईल. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र शनिवारी संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय शनिवारी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत शनी मीन राशीत प्रवेश करेल. २९ मार्च रोजी दर्श अमावस्या सुद्धा असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…
२९ मार्च पंचांग व राशिभविष्य:
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
दिवस दगदगीत जाईल. थोडा वेगळा विचार करून पहावा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी. कामात काही बदल करून पहावा लागेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. रेस, जुगार यांची आवड पूर्ण कराल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनाजोगी खरेदी करता येईल. सर्वांना आपलेसे कराल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
कौटुंबिक कामात गढून जाल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रासौख्य मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. जवळचे मित्र भेटतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
चारचौघात कौतुक केले जाईल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. तुमची अरसिकता दूर सारावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. मुलांच्या मताचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. पित्त विकार बळावू शकतात. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल. मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. भागिदारीतून उत्तम लाभ मिळेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. बाग-बगीच्याच्या कामात मन रमेल. अचानक धनलाभ संभवतो.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
बौद्धिक कौशल्य दाखवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या गप्पा माराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर