Dasara 12th October 2024 Horoscope and Panchang : १२ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी नवमी आणि शनिवार आहे.नवमी तिथी आज सकाळी १०.५९ पर्यंत असेल. त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. आज नवमी तिथीला विजयाचे प्रतीक असलेला ‘दसरा आणि विजयादशमी’ हा सणही साजरा केला जाईल. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. आज दसऱ्याच्या दिवशी रात्री १२.२२ पर्यंत धृति योग राहील. तर पहाटे ४.२८ दिवसभर श्रावण नक्षत्र जागृत असेल. आज दसऱ्या शुभदिनी कोणात्या राशींवर होईल सुखाची बरसात आणि कोणाच्या पदरात पडणार निराशा जाणून घेऊ या…
१२ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य ( 12th October 2024 Horoscope and Panchang )
मेष:-व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. करियर मध्ये प्रगती करता येईल.
वृषभ:-प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. जोडीदाराची प्रगती होईल.
मिथुन:-नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.
कर्क:-व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक. मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.
सिंह:-नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
कन्या:-व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.
तूळ:-सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.
वृश्चिक:-जुनी उधारी वसूल होईल. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. एखाद्या कामाला खीळ बसू शकते.
धनू:-सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.
मकर:-आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.
कुंभ:-मानसिक संतुलन राखावे. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.
मीन:-घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर