प्रत्येक व्यक्ती आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. परंतु काही लोक इतके भाग्यवान असतात की ते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नशिबावरही सकारात्मक प्रभाव पाडतात. आपल्या धर्मात मुलींना देवीचं रूप मानलं जातं. नवरात्रीमध्ये लहान मुलींची पूजा केली जाते. तसेच स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. एकूणच मुली आणि महिलांना आपल्या समाजात अत्यंत मनाचे स्थान दिले गेले आहे. ज्योतिष शास्त्रात ३ राशीच्या मुलींना आपल्या वडिलांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. या कोणत्या राशीच्या मुली आहेत हे जाणून घेऊया आजच्या लेखात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्क राशी :

कर्क राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी आणि परिवारासाठी अतिशय भाग्यवान ठरतात. जर कुंडलीचे ग्रह ठीक असतील तर या मुलींच्या जन्मापासूनच घरामध्ये सुख समृद्धी वाढीस लागते. वडिलांची बढत होते आणि उत्पन्नही वाढते. या मुली अत्यंत कुशल असतात. प्रत्येक काम या मन लावून करतात आणि कमी वयातच मोठे यश प्राप्त करतात.

‘या’ चार राशींच्या मुलींच्या रागाचा सामना कोणीही करू शकत नाही; असतात अतिशय स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर

कन्या राशी :

कन्या राशीच्या मुली आपल्या वडिलांसाठी भाग्यवान सिद्ध होतात. यामुळे आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या वडिलांचे आणि आपल्या परिवाराचे नाव मोठे करतात. तसेच या मुलींना कलात्मक कामांमध्ये विशेष रुची असते आणि या क्षेत्रात त्या विशेष यश संपादन करतात. या खूपच बुद्धिवान असतात तसंच कमी वयातच या खूपच समजूतदार असतात.

मकर राशी :

मकर राशीच्या मुली खूपच मेहनती, प्रामाणिक आणि खूपच दयाळू असतात. या आपल्या परिवाराची खूप काळजी घेतात आणि घरातील प्रत्येकजण यांचे लाड करतात. खासकरून यांच्या वडिलांसोबत यांचे नाते खूपच खास असते. या मुली नोकरी आणि व्यवसायात विशेष यश प्राप्त करतात. तसेच या मुली आपल्या लक्षाला घेऊन खूपच गंभीर असतात आणि ते पूर्ण करूनच दाखवतात. या मुलींचे हेच गुण सर्वांना आवडतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughters of this zodiac sign are very lucky for their father pvp