Diwali 2023 Date and Time: दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे तयारीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळी दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो. हिंदू धर्मातही दिवाळी सणाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. या सणाची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापासून होते. यात दिवाळी पाडव्याला विशेष महत्व असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशी या दिवाळी पाडव्याची ओळख आहे. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी दिवाळी पाडवा नेमका कधी आहे, शुभ मुहूर्त काय आणि महत्त्व जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी पाडवा कधी आहे?

पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी संपते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा असतो. यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी दिवाळी पाडवा आहे.

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज यंदा दिवाळीत ‘या’ तिथी व मुहूर्त लक्षात ठेवा! यंदा दिवाळीची पहिली अंघोळ कधी?

या शुभदिनी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. तसेच अनेक व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमाखर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यापारी वर्ष सुरु करतात. ज्याला विक्रमसंवत्सर असे म्हटल जाते. याशिवाय सूवासिनींकडून पतीची ओवाळणी केली जाते. यामुळे दोघांनी दीर्घयुष्य लाभते अशी श्रद्धा आहे.

लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांपैकी नवरदेवाला सासरच्या मंडळींकडून खास आमंत्रित करण्यात येते, त्यांच्यासाठी खास स्वादिष्ट जेवण केले जाते, त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

बलिप्रतिपदेची पूजा

दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व असते. बलिप्रतिपदेतील बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. त्याच्याकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने त्याला मारले. पण हा राजा जनतेची खूप काळजी घ्यायचा. म्हणून ग्रामीण भागात आजही अनेक महिला भावाला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी म्हण म्हणताना दिसतात.

दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त

१४ नोव्हेंबर – सकाळी ६ वाजून १४ मिनिटे ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.

तिथी – शु. प्रतिपदा १४.३६
नक्षत्र – अनुराधा २७.२३
योग – शोभन १३.५५
करण – बालव २६.१५

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepawali 2023 diwali padwa 2023 date time shubh muhurat puja vidhi and rituals signigficance importance sjr