हिंदू धर्मात विवाहाला १६ संस्कारापैकी एक मानले जाते. असे मानले जाते की या संस्काराशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होत नाही. परंतु अनेक कारणांमुळे लग्नाला विलंब होतो. ज्योतिषानुसार अनेकदा ग्रह-नक्षत्रांमुळे लग्नात विलंब होतो. बऱ्याचदा लग्न ठरल्यानंतरही ते मोडले जाते. अशावेळी काही उपाय केल्याने लग्नात येणारे विघ्न दूर होऊ शकतात. या लेखात आपण अशाच काही उपायांबाबत जाणून घेणार आहोत.
>> वास्तूशास्त्रानुसार ज्यांना लग्न करायचे आहे अशांची खोली नेहमी पश्चिम-उत्तर दिशेला असावी. जर असे करणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत उत्तर दिशेला खोली बनवून घ्यावी. याव्यतिरिक्त पलंग आणि भिंतीमध्ये उचित अंतर राखणे.
>> लग्नासाठी इच्छूक असणाऱ्या व्यक्तीने गुरुवारचा उपवास ठेवावा. सोबतच या दिवशी केळ्याच्या झाडाची पूजा करावी. याशिवाय पिवळ्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरू शकते. गायीला चण्याच्या डाळीच्या पिठात गूळ आणि हळद मिसळून खायला घालावे. शक्य असल्यास विष्णूच्या १०८ नावांचा जप करावा. असे केल्याने विवाहात येणारे विघ्न दूर होऊ शकतात.
मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार निवडताना मनात शंका येते? अशाप्रकारे तपासा प्रोफाइलची सत्यता
>> ज्योतिष शास्त्रानुसार विवाहासंबंधी समस्या सोडवण्यासाठी ६ मुखी रुद्राक्ष धारण करणे लाभदायी ठरते. या रुद्राक्षाला भगवान कार्तिकेय यांचे रूप मानले जाते. हे घातल्याने लग्नासंबंधी समस्या दूर होतील.
>> नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण करावे. शिवलिंगावर पाण्याशिवाय गाईचे कच्चे दूध आणि बेलची पानेही अर्पण करा. यानंतर भगवान शंकराला आपल्या मनातील इच्छा सांगा. कुमारिका कन्या १६ सोमवारचा उपवास करू शकतात. यासोबतच पार्वती मंगलचे पठणही करू शकता. असे केल्याने लवकर विवाह होण्याचे योग तयार होतात.
>> पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची १०८ वेळा प्रदक्षिणा करा. याशिवाय गुरुवारी वडाच्या झाडाला जल अर्पण करावे. याने लग्नात येणारे विघ्न लवकरच दूर होतील आणि विवाहयोग्य योग तयार होतील.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)