Dev Uthani Ekadashi 2023: दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णुप्रबोधोत्सव असेही म्हटले जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठनी एकादशी म्हणतात. यावर्षी देवउठनी एकादशी गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी क्षीरसागरात निद्रावस्थेत गेलेले भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रातून जागे होतात, असेही मानले जाते.
पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल एकादशीची तिथी २२ नोव्हेंबर रात्री ११ वाजून ३ मिनिटांनी सुरु होणार आहे तर २३ नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी रात्री ९ वाजून १ मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, देवउठनी एकादशी ही २३ नोव्हेंबरला असणार आहे. यावर्षी देवउठनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि महालक्ष्मी योग यांचा संयोग आहे, जो चार राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरु शकतो.
मेष राशी
देवउठनी एकादशी मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यापारवर्गाची व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होऊ शकतात. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये विशेष लाभ मिळू शकतो. कठोर परिश्रमाचे या काळात फळ मिळण्याची शक्यता आहे. पैशांचे स्त्रोत वाढू शकतात.
(हे ही वाचा : जून २०२४ पासून ‘या’ राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा? शनिदेवाच्या कृपेने कोण होणार करोडपती?)
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या काळात सर्व कामांमध्ये सुधारणा दिसून येऊ शकतात. कमाईचे नवीन मार्ग मिळून भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. अभ्यासू विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. नात्यातील तणाव दूर होऊ शकतो. व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात चांगल्या बातम्या मिळू शकतात. या काळात या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागू शकतात. कामाच्या ठिकाणी नफा होण्यासोबतच सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळू शकतो. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. या काळात लोकांना व्यवसाय आणि नोकरीत बढती मिळू शकते. मोठा धनलाभ होऊन आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)