Dev Uthani Ekadashi 2024 Date : कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. ही एकादशी कार्तिकी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले विष्णू देव या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर पडतात आणि शुभ मुहूर्तास सुरुवात होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी तुळशी विवाह सुद्धा पार पडतो आणि प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

यंदा देवउठनी म्हणजेच कार्तिकी एकादशी कधी आहे, जाणून घेऊ या.

Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
venus transit jyeshta nakshatra
दिवाळीनंतर धनाचा दाता शुक्र जेष्ठा नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींना मिळणार पैसाच पैसा
16th October Rashi Bhavishya In Marathi
१६ ऑक्टोबर पंचांग: कोजागिरी पौर्णिमेला १२ पैकी कोणत्या राशींना लाभणार धनलाभासह, स्वप्नपूर्तीचा योग; वाचा तुमचे भविष्य
15th October Rashi Bhavishya In Marathi
१५ ऑक्टोबर पंचांग: वैवाहिक अडथळे दूर ते कर्जमुक्ती; मंगळवारी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; वाचा तुमच्या कुंडलीत कसं येणार सुख
Kojagiri Purnima 2024 Wishes In Marathi
Kojagiri Purnima 2024 Wishes : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास मराठीत शुभेच्छा! WhatsApp स्टेटसवर ठेवून प्रियजनांसह साजरा करा आनंद
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज तुम्हाला कोणत्या मार्गाने होणार लाभ; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी देवीची साथ, १२ पैकी कोणत्या राशींचा सुरु होणार आज सुवर्णकाळ? वाचा तुमचं भविष्य

पंचागनुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होील आणि १२ नोव्हेंबर संध्याकाळी ४ वाजून ३ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे १२ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी केली जाईल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुळशी विवाह संपन्न होईल. तुळशी विवाहानंतर सर्व प्रकारच्या शुभ कार्यास सुरुवात होते.

हेही वाचा : Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

शुभ योग

देवउठनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग निर्माण होत आहे. या दिवशी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत हर्षण योग निर्माण होणार. तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग निर्माण होत आहे. सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सुरू होणार जो १३ नोव्हेंबरला सकाळी ५ वाजून ४१ मिनिटांनी संपणार. तसेच रवि योग सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होणार जो ७ वाजून ५१ मिनिटांनी समाप्त होईल.

कार्तिकी एकादशीला या मंत्राचा करा जप

ॐ अं वासुदेवाय नम:
ॐ आं संकर्षणाय नम:
ॐ अं प्रद्युम्नाय नम:
ॐ अ: अनिरुद्धाय नम:
ॐ नारायणाय नम:
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ॐ विष्णवे नम:
ॐ हूं विष्णवे नम:

हेही वाचा : Diwali Lakshmi Puja 2024 : ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? तुमच्या शहरानुसार जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख अन् मुहूर्त

दिवाळीनंतर येणार्‍या एकादशीला देव उठतात, असे आपल्या वेद आणि पुराणांमध्ये मानले जाते. यामुळेच देवुतानी ग्यारसानंतर लग्न, मुलांचे मुंडण, गृहप्रवेश इत्यादी सर्व शुभ कार्ये सुरू होतात. ग्यारसाच्या दिवशी तुळशी विवाहही होतो. घरांमध्ये तांदळाच्या पिठापासून चौकोनी बनवले जाते. उसाच्या मंडपात भगवान विष्णूची पूजा केली जाते. फटाके उडवले जातात. देवूठाणी ग्यारस ही छोटी दिवाळी म्हणूनही साजरी केली जाते. देवूठाणी किंवा देव प्रबोधिनी ग्यारस दिवसापासून शुभ कार्यक्रमांच्या रखडलेल्या रथाला पुन्हा गती मिळते.

कार्तिक शुक्ल एकादशीचा हा दिवस तुळशीविवाह म्हणूनही साजरा केला जातो आणि या दिवशी पूजा करण्याबरोबरच घरात येणारे शुभ कार्य कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण व्हावेत अशी कामना केली जाते.  लग्नाशिवाय या दिवसापासून उपनयन, गृहप्रवेश इत्यादी अनेक शुभ कार्ये सुरू होतात.