सनातन धर्मात एकादशी तिथी ही महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. देवउठणी एकादशी (Dev Uthani Ekadashi 2024) हे व्रत कार्तिक महिन्यात पाळले जाते. या शुभ तिथीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की,”हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व कामांमध्ये यश मिळते आणि विष्णू देव प्रसन्न होतात.
Dev Uthani Ekadashi 2024 Date: एकादशी तिथी भगवान विष्णुला समर्पित केली जाते.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवउठणी एकादशीचे व्रत करण्याचे विधान आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवद्य म्हणून ठेवले जातात. सर्व एकादशी तिथींपैकी देव उठणी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी मनापासून पूजा केल्याने साधकाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि घर सुख-समृद्धीने भरून जाते, असा विश्वास आहे.देवउठणी एकादशी का साजरी केली जाते आणि केव्हा साजरी केली जाणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला मग जाणून घेऊ या…
देवउठणी एकादशीचे धार्मिक महत्व(Dev Uthani Significance)
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हा दिवस देव उठणी एकादशी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शुभ असून मांगल्यपूर्ण कामाला सुरुवात होते. या शुभ दिवशी, भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. यासह खास गोष्टींचे दान करतात. आहेत. अशी मान्यता आहे की,या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांमधून सुटका होते. तसेच या व्रत केल्याने शुभ फळ मिळते.
देवउठणी एकादशी 2024 तारीख आणि मुहूर्त (Dev Uthani Ekadashi 2024 Shubh Muhurat)
पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ०६:४६ वाजता सुरू होईल. त्याच वेळी, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४:०४ वाजता संपेल. अशा प्रकारे देवउठणी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे. दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाचा उत्सवही साजरा होणार आहे.
एकादशी व्रत पाळण्याची वेळ पुढीलप्रमाणे –
देवउठणी एकादशी व्रत १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६:४२ ते ०८:५१ पर्यंत आहे.
या मंत्राचा केला जातो जप (Mantra on Ekadashi)
- ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्
- श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे।
- हे नाथ नारायण वासुदेवाय।
हेही वाचा – Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
u
विष्णुचे पंचरूप मंत्र –
- ॐ अं वासुदेवाय नम:।।
- ॐ आं संकर्षणाय नम:।।
- ॐ अं प्रद्युम्नाय नम:।।
- ॐ अ: अनिरुद्धाय नम:।।
- ॐ नारायणाय नम:।।
- ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान। यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्यते।।