-जयंती अलूरकर
Devendra Fadnavis Astrology Prediction: प्रत्येक देशाचे आधीभौतिक, आधीदैविक धारणा, वैचारिक अधिष्ठाने, त्यांचे स्वतःचे म्हणून एक संचित असते. त्या संचित मूल्यांचे ज्याला आकलन होते व ज्याला संचिताबरोबर ध्येय व स्वप्न ह्यांचा अनुबंध साधता येतो, तो निव्वळ राजकारणी नव्हे तर द्रष्टा राजकारणी होतो. Tarot कार्ड्स च्या मदतीने आपण राजकीय नेत्यांच्या अंतरंगात डोकावून त्यांचा २०२३-२०२४ ह्या कालखंडाचा राजकीय प्रवास पाहणार आहोत.
आपल्यापैकी प्रत्येकालाच भविष्यात काय होणार ह्याचे कुतुहूल असतेच. टॅरोरुपी आरश्यात पाहताना भूत, वर्तमान आणि भविष्यात घडणाऱ्या घटनांचा चित्ररूपी पट आपल्यासमोर उभा राहतो. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानात दिसतो. तो योग्य वेळी आपण समजवून घेऊन त्या प्रमाणे कृती केल्यास भविष्यात आपल्याला चांगले परिणाम साधता येतात. त्यामुळे व्यक्ति, परिस्थिती, देव अश्या गोष्टींना दोष देत बसण्यात वेळ न घालवता, मनुष्य कृतिशील होतो. आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या मदतीने आपले ध्येय गाठतो.
ऐन तारुण्यात राजकारणातील धुरंधर व्यक्तींचे लक्ष वेधून घेत इतरांपेक्षा वेगळ्या शैलीत राजकीय व्यवहार करण्याचे कसब साधलेला नेता म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. टॅरोच्या चित्ररूपी आरश्यात फडणवीसांचा चेहरा कधी धीर गंभीर, तर कधी अगदी मिश्किल दिसत आहे. भावनाप्रधानता ते वास्तवाचे परिपूर्ण भान ठेवताना स्वतः संयत वृत्तीची वेळोवेळी ते प्रचिती करून देत असतात. लोकभावना आणि उद्दिष्टांची पूर्ती ह्यांची सुयोग्य सांगड घालताना राजकारणात सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न ते या वर्षात करतील.
फडणवीसांचे मित्रच ठरतील शत्रू?
या वर्षाची सुरुवात तणावपूर्ण वातावरणात जरी झाली असली तरी महाराष्ट्राच्या इतर लोकनेत्यांपेक्षा एक ज्यास्त कणखर व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस पुढे येतील. वागण्या-बोलण्यातून राष्ट्रीय स्तरावर राजकारणाचे सातत्याने भान ठेवणारा लोकनेता अशी त्यांची ठळक प्रतिमा होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रहित जपणे या त्यांच्या विशेष गुणामुळे विरोधक त्यांच्यावर अनेकप्रकारे चिखलफेक करताना दिसतील. यंदा त्यांना विरोधी पक्षातल्या विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत विरोधकांना ही तोंड द्यावे लागेल असे दिसतंय. वेळप्रसंगी ते विरोधकांना समजवून घेताना दिसतील, आणि तशीच वेळ आल्यास प्रसंगी अतिकठोर निर्णय घ्यायला ते मागेपुढे पाहणार नाहीत.
फडणवीस आणि २०२४..
या वर्षात महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढावी, व तरुण वर्गाची नोकरी व व्यवसायात भरभराट व्हावी ह्यासाठी ते विशेष प्रयत्न करताना दिसतील. तसेच महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल. असे झाल्यास २०२४ मधील निवडणुकीत भाजप ला युतीत भरघोस यश मिळेल.
हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंची कुंडली सांगते की, २०२५ आधीच…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांची महत्त्वाची भविष्यवाणी
फडणवीसांना दिल्लीतून काय मिळणार?
यंदा फडणवीस ह्यांच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर व त्यांची पक्षावरची निष्ठा व समर्पण ह्यांमुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे विशेष कौतुक होईल. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पक्ष त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. यंदा येणाऱ्या अडचणी फडणवीस सांघिक प्रयत्नातून सहजच लीलया पेलतील. पक्षकार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत, तसेच सर्व प्रकारच्या विरोधकांशी त्यांचे सामंजस्यपूर्ण संबंध हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे दिसते आहे.