Devendra Fadnavis Astrology: महाराष्ट्राच्या राजकारणात सतत होणारी उलथापालथ पाहता नक्की कोणाचे ग्रह मजबूत आहेत आणि कोणाची शक्ती कमी पडतेय हेच कळेनासे झाल्याची चर्चा सध्या जनसामान्यांमध्ये रंगली आहे. मागील काही दिवसांमध्ये अजित पवारांची बंडखोरी पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून त्यांचे ‘उप’ पद निसटणार अशा चर्चा होत्या. पण अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांना आपले पद राखण्यात यश आले आणि राज्यात दोन उपमुख्यमंत्री विराजमान झाले. योगायोगाने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फक्त पदच नव्हे तर वाढदिवसही आज एकाच दिवशी आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कुंडलीनुसार येणारे नवे वर्ष त्यांच्यासाठी काय घेऊन येऊ शकते याचा आढावा घेऊया…

देवेंद्र फडणवीस आणि २०२४..

२०२३ या वर्षात महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढावी आणि तरुण वर्गाची नोकरी व व्यवसायात भरभराट व्हावी ह्यासाठी देवेंद्र फडणवीस विशेष प्रयत्न करताना दिसतील. तसेच महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यास २०२४ मधील निवडणुकीत भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या जनमानसातील ‘प्रतिमे’वर व काही अंशी युतीमुळे भरघोस यश लाभू शकते.

Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
2025 ruled by Mars
२०२५ वर मंगळ ग्रहाचे वर्चस्व; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

२०२३-२४ दरम्यान फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर आणि त्यांची पक्षावरची निष्ठा व समर्पण ह्यांमुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे विशेष कौतुक होईल. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पक्ष त्यांच्यामागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. यंदा येणाऱ्या अडचणी फडणवीस सांघिक प्रयत्नातून सहजच लीलया पेलतील. पक्षकार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत, तसेच सर्व प्रकारच्या विरोधकांशी त्यांचे सामंजस्यपूर्ण संबंध हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे दिसते आहे. याच कौतुकातून फडणवीसांवर दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवण्याचा विचार होऊ शकतो.

लोकभावना आणि उद्दिष्टांची पूर्ती ह्यांची सुयोग्य सांगड घालताना राजकारणात सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न ते या वर्षात करतील. महाराष्ट्राच्या इतर लोकनेत्यांपेक्षा एक जास्त कणखर व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस पुढे येतील. महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रहित जपणे या त्यांच्या विशेष गुणामुळे विरोधक त्यांच्यावर अनेकप्रकारे चिखलफेक करताना दिसतील. यंदा त्यांना विरोधी पक्षातल्या विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत विरोधकांनाही तोंड द्यावे लागेल असे दिसतंय. वेळप्रसंगी ते विरोधकांना समजवून घेताना दिसतील, आणि तशीच वेळ आल्यास प्रसंगी अतिकठोर निर्णय घ्यायलाही ते मागेपुढे पाहणार नाही.

हे ही वाचा<< “एकनाथ शिंदे सत्तेत राहतील पण…”, अजित पवारांच्या एंट्रीनंतर ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

दरम्यान, २०२४ हे वर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे आहे, येत्या काळात फडणवीस-शिंदे -पवार ही युती कायम राहणार का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

(अजित पवार यांच्या कुंडलीवरून करण्यात आलेल्या विश्लेषणाचा- भाग २ वाचायला विसरू नका)

Story img Loader