Devendra Fadnavis Astrology: महाराष्ट्राच्या राजकारणात सतत होणारी उलथापालथ पाहता नक्की कोणाचे ग्रह मजबूत आहेत आणि कोणाची शक्ती कमी पडतेय अशा चर्चा सामन्यांमध्ये रंगत आहेत. अलीकडेच पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपचे राज्यातील स्थान दुबळे होत आहे का? राज्यात २०२४ मध्ये पुन्हा सत्ता बदल होणार का? असेही प्रश्न समोर आहेत. अशातच भाजप नेत्यांच्या विधानांवरून महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रहांची स्थिती पाहता २०२४ मध्ये फडणवीसांवर महाराष्ट्रापेक्षा मोठी जबाबदारी दिल्लीतून सोपवण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ जयंती अलुरकर यांनी फडणवीसांच्या कुंडलीचा अभ्यास करून २०२४ साठी मोठी व महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि २०२४..

२०२३ या वर्षात महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढावी, व तरुण वर्गाची नोकरी व व्यवसायात भरभराट व्हावी ह्यासाठी देवेंद्र फडणवीस विशेष प्रयत्न करताना दिसतील. तसेच महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यास २०२४ मधील निवडणुकीत भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या जनमानसातील ‘प्रतिमेवर’ व काही अंशी युतीमुळे भरघोस यश लाभू शकते.

Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
people born on these dates are Best Wife
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य
Mangal Gochar 2025 Mangal Pushya Yog 2025
Mangal Gochar 2025 : मंगळाच्या पुष्य नक्षत्रातील ५० वर्षांनंतरच्या प्रवेशामुळे ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; करिअर, व्यवसायात प्रगती अन् संपत्तीत प्रचंड वाढ
Shukra Gochar 2025
१२३ दिवस पैसाच पैसा! ‘धनाचा दाता’ शुक्र ग्रह करणार गोचर, ‘या’ राशींना मिळणार राजासारखे सुख

२०२४ मध्ये भाजप जिंकल्यास फडणवीसांना दिल्लीत काय मिळणार?

२०२३-२४ दरम्यान फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर व त्यांची पक्षावरची निष्ठा व समर्पण ह्यांमुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे विशेष कौतुक होईल. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पक्ष त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. यंदा येणाऱ्या अडचणी फडणवीस सांघिक प्रयत्नातून सहजच लीलया पेलतील. पक्षकार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत, तसेच सर्व प्रकारच्या विरोधकांशी त्यांचे सामंजस्यपूर्ण संबंध हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे दिसते आहे. याच कौतुकातून फडणवीसांवर दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवण्याचा विचार होऊ शकतो.

हे ही वाचा<< “देवेंद्र फडणवीसांवर मित्रांकडूनच चिखलफेक…” ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणतात, “पक्षातच शत्रू…”

दरम्यान, जयंती अलुरकर यांचा अभ्यास सांगतो की, टॅरोच्या चित्ररूपी आरश्यात फडणवीसांचा चेहरा कधी धीर गंभीर, तर कधी अगदी मिश्किल दिसत आहे. भावनाप्रधानता ते वास्तवाचे परिपूर्ण भान ठेवताना स्वतः संयत वृत्तीची वेळोवेळी ते प्रचिती करून देत असतात. लोकभावना आणि उद्दिष्टांची पूर्ती ह्यांची सुयोग्य सांगड घालताना राजकारणात सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न ते या वर्षात करतील.

– जयंती अलुरकर

Story img Loader