Devendra Fadnavis Astrology: महाराष्ट्राच्या राजकारणात सतत होणारी उलथापालथ पाहता नक्की कोणाचे ग्रह मजबूत आहेत आणि कोणाची शक्ती कमी पडतेय अशा चर्चा सामन्यांमध्ये रंगत आहेत. अलीकडेच पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपचे राज्यातील स्थान दुबळे होत आहे का? राज्यात २०२४ मध्ये पुन्हा सत्ता बदल होणार का? असेही प्रश्न समोर आहेत. अशातच भाजप नेत्यांच्या विधानांवरून महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रहांची स्थिती पाहता २०२४ मध्ये फडणवीसांवर महाराष्ट्रापेक्षा मोठी जबाबदारी दिल्लीतून सोपवण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ जयंती अलुरकर यांनी फडणवीसांच्या कुंडलीचा अभ्यास करून २०२४ साठी मोठी व महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा