Deputy Chief Minister Devendra Fadnavis: खवळलेल्या समुद्रालासुद्धा ओहोटी आली की, नतमस्तक व्हावे लागते. हा निसर्गाचा नियम आहे मग बुद्धीमान राजकारणी माणसात ही समज का नसावी? राजकारणात इंदिरा गांधीनाही त्यांच्या अहंगडामुळे पायउतार व्हावे लागले होते. एकूण सध्याचे राजकारण पाहता दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय स्थितीत अहंपणाचा हा वारु सुसाट सुटला आहे. प्रसिद्धी माध्यमात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांची भाषा, त्यांचे बोलणे, हातवारे पाहता राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे तेच दिसून येते आणि ही सर्व अरेरावी पक्षबदलू लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. केवळ स्वार्थापोटी आलेली ही मंडळी त्यांना पक्षाचा दर्जा, विचारसरणी यांच्याशी काहीही देणे- घेणे नसते. कधीही पक्ष सोडून जाण्याची त्यांची तयारी असते आणि विशेष म्हणजे पक्षाच्या जुन्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना सहज बाजूला सारून स्वतःपुढे येऊन ते मिरवत असतात. ही सारी गंमत चतुर जनता शांतपणे पाहात असते. अशा या लोकांमुळेच पक्षाचा दर्जा खालावत असतो. खऱ्या अर्थाने या अहंकारी वागणुकीला जनता आता कंटाळलेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनातून असा पक्ष पार खाली उतरतो. त्यामुळेच जाणकार समजुतदार उत्तम बोलणारे प्रवक्ते खऱ्या अर्थाने मतदार तयार करत असतात. नेत्यांच्या भाषणांनी लोकमत फारसे तयार होत नाही व झाले तर कधी कधी फार नुकसान होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा