Guru Nakshatra Parivartan 2024: नऊ ग्रहांच्या गोचरचा आपल्या जीवनावर निश्चितच प्रभाव पडतो. कधी आपण यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करतो, तर कधी अनपेक्षितपणे आपल्याला संघर्षांना सामोरे जावे लागते. याचे मुख्य कारण म्हणजे या नऊ ग्रहांच्या राशीतील बदल, जे नेहमी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करून आपल्या जीवनात बदल घडवून आणतात. नुकतेच गुरूने नक्षत्र बदलून मंगळ मृगा नक्षत्रात प्रवेश केला आहे. नऊ ग्रहांपैकी देव गुरु बृहस्पती हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. गुरु ग्रह एका वर्षात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि २७ नक्षत्रांमधूनही फिरतो. सध्या गुरु वृषभ राशीत असून २० ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी मंगळाच्या मृग नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि २८ नोव्हेंबर २०२४ 2024 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. मंगळ हा संयम, धैर्य आणि पराक्रमाचा ग्रह मानला जातो आणि गुरूचा मित्रही आहे. गुरु हा ज्ञान आणि बुद्धीचा स्वामी आहे. शक्ती आणि ज्ञानाची ही युती काही राशीच्या लोकांसाठी खूप आनंददायी असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा