Dhanlakshmi Rajyog : ग्रहाचे सेनापती एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. मंगळ हा आत्मविश्वास, धाडस, ध्येय इत्यादीचा कारक मानला जातो. मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यावर पडतो. मंगळ ग्रह सध्या कर्क राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे काही राजयोग निर्माण करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ ग्रह शनि आणि चंद्राबरोबर नीच भंग राजयोग निर्माण करत आहे. त्यामुळे मंगळाचा सकारात्मक परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांवर दिसून येईल. याशिवाय मंगळ कर्क राशीमध्ये गेल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. धनलक्ष्मी योग तयार झाल्याने कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकतो, जाणून घेऊ या.

वृश्चिक राशी (Vraschik Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी धनलक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मंगळ ग्रह या राशीच्या नवव्या स्थानावर आहे म्हणजेच भाग्य भावमध्ये विराजमान आहे. अशात यांना धनलक्ष्मी राजयोगचा विशेष लाभ मिळू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील. तसेच या राशीच्या पाचव्या स्थानी राहु विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या जीवनात अनेक प्रकारचा आनंद दिसून येईल.

हेही वाचा : दिवाळीपूर्वी नवपंचम राजयोगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब, राहु आणि मंगळाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा

करिअर, व्यवसायाच्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या समाप्त होईल. प्रेम संबंधामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. एकमेकांविषयी प्रेम वाढेल. नशीबाची चांगली साथ मिळेन ज्यांमुळे हे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे कमावू शकतात. या लोकांना करिअरमध्ये पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.

मेष राशी (Mesh Zodiac)

मंगळ ग्रह या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि तो सध्या चौथ्या भावात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. हे लोक पैसा कमी खर्च करणार. तसेच हे लोक आत्मचिंतन करतील ज्यामुळे ते त्यांच्या खर्चासह स्वत:वर लक्ष केंद्रित करतील. पैसे कमावण्याचे स्त्रोत उघडतील. अचानक धनलाभ होऊ शकतो.

हे लोक जास्तीत जास्त धन पैसा कमावण्याचा विचार करतील. तसेच गुंतवणूक केल्याने यांना भरपूर लाभ मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते. करिअर क्षेत्रात तुम्ही केलेल्या मेहनतीनंतर भरपूर यश प्राप्त होऊ शकते. तसेच राहुच्या कृपेने या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

जे लोक आधीच परदेशात आहे त्यांची खूप प्रगती होईल. कुटुंबात सर्वांचे आरोग्य उत्तम राहीन. आयात निर्यात व्यवसायात सु्द्धा लाभ मिळू शकतो. या लोकांना मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो.

हेही वाचा : Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?

धनु राशी (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या कुंडलीमध्ये आठव्या स्थानी मंगळ विराजमान आहे. त्यामुळे या राशीला अचानक धनलाभ होऊ शकतो. पितृ संपत्ती मिळू शकते. जीवनात सुख समृद्धी नांदेल. दीर्घ काळापासून सुरू येत असलेल्या अडचणी दूर होतील. नशीबाची साथ मिळेन.

मागील वर्षाच्या काही चुका सुधारण्याची ही वेळ आहे. भौतिक सुख सुविधांमध्ये अडचणी होतील. घरात सुरू असलेल्या वाद विवाद समाप्त होतील. राहु चौथ्या स्थानी असल्याने घर, वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. घरात सुख सुविधांमध्ये वृद्धी होऊ शकते. आईचे आरोग्य उत्तम राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanlakshmi rajyog before dhanayatrodashi or dhanteras these lucky zodiac signs will get money and wealth by maa lakshmi grace ndj