Budh Uday 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली, तर त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता, व्यवसाय व एकाग्रता यांचा कारक मानला जाणाऱ्या बुध ग्रहाचा २२ ऑक्टोबरला तूळ राशीत उदय होणार आहे. बुधाच्या तूळ राशीतील उदयामुळे काही राशींच्या लोकांच्या अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ की, बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुद्रिक पंचांग नुसार, २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ६.५८ वाजता बुध ग्रहाचा शुक्राच्या तूळ राशीत उदय होणार आहे. अशा स्थितीत काही राशींच्या लोकांसींना विशेष लाभ मिळू शकतो.

बुध ग्रहाचा उदय ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी

मिथुन

बुधाचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासह चांगला वेळ घालवता येऊ शकतो. करिअर क्षेत्रात उच्च प्रगतीसह नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही समाधानी राहू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. या काळात तुम्ही अधिकाधिक पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. जीवनात फक्त आनंद असू शकतो. लव्ह लाइफमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या जोडीदारासह तुमचा वेळ चांगला जाईल. आरोग्य चांगले राहील.

Shani Mangal Gochar : शनीची मंगळावर वक्रदृष्टी; ‘या’ राशींचा सुरू होणार वाईट काळ; नोकरी, व्यवसायात अडचणी अन् आर्थिक संकटे

कन्या

बुधाच्या राशिबदलाने कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात कुटुंबाची प्रगती होईल आणि आनंदाचे क्षण येतील. तुम्ही तुमच्या कामाबद्दल अधिक सतर्क आणि जागरूक असाल. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. पण याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. लव्ह लाईफ चांगले जाणार आहे. आरोग्य चांगले राहील.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. या काळात आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल; ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त आनंद असू शकेल. तुम्हाला व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीमधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanteras 2024 budh uday mercury set in tula these zodiac sing will be shone and get more money and happines sjr