Horoscope Today, 29 October : आज २९ ऑक्टोबर रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी मंगळवारी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. बुधवारी ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत वैधृती योग राहील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

याशिवाय मंगळवारी त्रयोदशी आल्याने ही तिथी भौम प्रदोष म्हणून ओळखली जाईल. तसेच आज धनत्रयोदशीही साजरी केली जाईल. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सोने, चांदी, भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. तर आज कोणाच्या धन, सुख, समृद्धी येणार हे आपण जाणून घेऊयात…

28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक जीवनात गोडवा; मेष ते मीनपैकी कोणत्या राशींना कामात मिळेल भरभरुन यश? वाचा तुमचे भविष्य
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते मीनपैकी कोणाला मिळणार कष्टाचे फळ; व्यवसायात होईल नफा तर नवीन कामात मिळणार भरपूर यश
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला वाव तर कोणाला होईल अचानक धनलाभ; वाचा तुमचा कसा असणार मंगळवार
Kartik Month Rashifal
‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा
13th October Rashi Bhavishya In Marathi
१३ ऑक्टोबर पंचांग: वैवाहिक जीवन सुखमय, कुटुंबात प्रेम-गोडवा; मेष ते मीनपैकी कोणत्या राशीचा सुट्टीचा दिवस जाईल आनंदाचा?
Weekly Tarot Horoscope 7th to 13th October 2024
साप्ताहिक राशिभविष्य : मिथुन आणि कर्क राशीसह ‘या’ राशींचे नशीब चमकणार, प्रगतीसह मिळणार अपार पैसा

२९ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य ( Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- आनंदी भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा.

वृषभ:- कामात क्षुल्लक अडचणी येतील. नोकर वर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.

मिथुन:- जुनी कामे पूर्णा होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका.

कर्क:- अध्यात्मा विषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो.

सिंह:- मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल.

कन्या:- तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ:- मेहनती मुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.

वृश्चिक:- आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल.

धनू:- सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा . आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.

मकर:- स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कुंभ:- नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल.

मीन:- नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )