सोमवार, २४ ऑक्टोबर २०२२ पासून नवीन आठवडा सुरू होत असून विशेष म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सर्व बारा राशींवर प्रभाव पडतो. ग्रहांच्या हालचालीवरून साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेता येते. ग्रहांच्या हालचालीमुळे येणारा आठवडा काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे, तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

  • मेष :

या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण तुम्हाला संयमही ठेवावा लागेल. त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक सुखात वाढ होण्याची संभावना आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. आशा-निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील, स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, कुटुंबात मान-सन्मान वाढण्याची आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते.

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Rashi Bhavishya 2025 in Marathi
Capricorn Yearly Horoscope 2025: मकर राशीला वर्षभर गुरुची साथ! धनलाभासह शिक्षण, नोकरीत होतील मोठे बदल; सोनल चितळेंनी सांगितले १२ महिन्यांचे भविष्य
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
  • वृषभ :

या आठवड्यात मनःशांतीसह असंतोषही राहील. कुटुंबात सुख-शांती राहून शत्रूंवर विजय प्राप्त करता येऊ शकतो. भावांसोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संभाषणात संयम ठेवा, बोलण्यात कठोरपणा आणू नका. खर्च वाढू शकतो. शैक्षणिक कार्यात यश मिळू शकते. तसेच, नोकरीत प्रवासाला जावे लागू शकते. या आठवड्यात मित्रांकडून सहकार्य मिळू शकते.

  • मिथुन :

मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते. नोकरीत आणि कार्यक्षेत्रात बदल संभवतो. दुसरीकडे, मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात आरोग्याबाबत जागरुक राहा. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. स्वतःला शांत ठेवून बोलण्यात सौम्यता ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात मेहनतीचे प्रमाण अधिक राहील.

  • कर्क :

येणाऱ्या आठवड्यात आपल्या भावनांवर नियंत्रण आणि आत्मसंयम ठेवा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यामुळे कीर्ती आणि सन्मान वाढण्याची संभावना आहे. कुटुंबात शांतता राहील. कुटुंबासह धार्मिक स्थळी यात्रेला जाऊ शकता. आत्मविश्वास वाढेल पण रागाचा अतिरेकही शकतो. जीवनसाथीसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात.

  • सिंह :

या आठवड्यात आई-वडील यांचे सहकार्य लाभू शकते. संचित संपत्ती कमी होऊ शकते. उत्पन्नात घट आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, कारण स्वभावात चिडचिडेपणा राहण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. घरामध्ये धार्मिक कार्य करता येईल, धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यताही निर्माण होत आहे.

  • कन्या :

येणाऱ्या आठवड्यात चिडचिड होऊ शकते, पण आत्मविश्वास वाढेल. कामात उत्साह राहील. नोकरी आणि कार्यक्षेत्रात विस्तार होऊ शकतो. स्थलांतराचीही शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकते. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. मनःशांती राहील पण कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, उत्पन्नही वाढू शकते.

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

  • तूळ :

मनात शांती आणि आनंदाची भावना राहील, परंतु संभाषणात संयम ठेवावा लागेल. येणाऱ्या आठवड्यात रागाचा अतिरेक टाळावा. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळू शकतात. संशोधन इत्यादीसाठी इतर ठिकाणी जावे लागू शकते. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळण्याची संभावना आहे. यावेळी प्रगतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते, मित्रांचे सहकार्य मिळू शकते.

  • वृश्चिक :

या आठवड्यात आत्मविश्वास वाढू शकतो. संतती सुखात वाढ होऊ शकते. या काळात रागाचा अतिरेक टाळावा. उच्च शिक्षण आणि संशोधन इत्यादींसाठी परदेशी स्थलांतर होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. मनामध्ये शांती आणि आनंदाची भावना राहू शकते.

  • धनु :

या दिवसांमध्ये मनःशांती राहील, मात्र रागाचा अतिरेक टाळावा. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे, इच्छेविरुद्ध काही नवीन काम करावे लागू शकते. कार्यक्षेत्रात कष्टाचे प्रमाण वाढण्याची संभावना आहे. आत्मविश्वास वाढू शकतो, तसेच कला आणि संगीतात रुची वाढण्याची शक्यता आहे.

  • मकर :

या आठवड्यात मालमत्तेतून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कला आणि संगीतात रुची वाढू शकते. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागू शकते. उत्पन्न वाढू शकते. कौटुंबिक जीवन आनंदात जाऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची संभावना आहे.

  • कुंभ :

या आठवड्यात संयम कमी होऊ शकतो, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याची संभावना आहे, मात्र त्याचबरोबर कपड्यांवरील खर्च वाढू शकतो. मनःशांती लाभली तरीही मनात असंतोष असू शकतो. कुटुंबात धार्मिक कार्ये पार पडू शकतात, तसेच कपडे वगैरे भेटवस्तू मिळू शकतात. अनियोजित खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून धनप्राप्ती होऊ शकते.

  • मीन :

या आठवड्यात तुम्हाला आईचे सहकार्य मिळू शकते. संभाषणात संयमी राबवावे. संचित संपत्तीत घट होऊ शकते. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखती इत्यादी आनंददायी परिणाम देण्याची शक्यता आहे. वाहन सुख वाढू शकते. राग आणि उत्कटतेचा अतिरेक होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखात वाढ होऊ शकते. मुलांना काही किरकोळ आजार होऊ शकतात. लेखन कार्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्याबाबत जागरुक राहावे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader