Diwali 2023 : दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा नवचैतन्य आणणारा सण. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते आणि या दिवशी दिवे, पणती पेटवून आपलं घर उजळून टाकण्याची प्रथा आहे. पौराणिक कथांनुसार दसऱ्याच्या दिवशी जेव्हा रामाने रावणाचा वध केला त्यानंतर प्रभू रामचंद्र हे अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येत लोकांनी दिवाळी साजरी केली होती. दसरा झाल्यानंतर २० दिवसांनी दिवाळी येते. या दिवशी लक्ष्मीपूजन आणि गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर संपूर्ण घरात पणत्या, निरंजन असे दिवे लावले जातात. मात्र एक दिशा अशी आहे ज्या दिशेला पणती लावली जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिव्याची वात कुठल्या दिशेला असावी याचे नियम काय?

धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीत दक्षिण दिशेला पणतीची ज्योत करुन पणती लावू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली असल्याने या दिशेला दिव्याची ज्योत करु नये असं मानलं जातं.

पूर्वेकडे ज्योत करुन दिवा लावणं किंवा ईशान्य कोनात दिवा लावणं किंवा उत्तरेच्या दिशेने दिव्याची ज्योत ठेवणं हे शुभ मानलं जातं.

घरात तुळस असल्यास तुळशीजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. ज्या घरात तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात सुख, शांती, समृद्धी येते अशीही श्रद्धा आहे.

स्वयंपाक घरात दिवा लावणं शुभ

स्वयंपाक घरात दिव्याची ज्योत पूर्वेच्या दिशेने लावून ठेवल्यास अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो अशीही श्रद्धा आहे.

पणती किंवा दिवा हा तेल किंवा तुपाचा लावावा तो शुभ मानला जातो.

पणतीतली वात लांब आणि दुहेरी पिळ असलेली असावी ते देखील शुभ मानलं गेलं आहे.

दिवाळी म्हणजे दिव्यांच्या उत्सव. मनातला , वातावरणातला अंधार, काळजी, उद्वेग दूर करणारा हा सण. घरात लाईट जरी असले तरीही आपण पणती लावतोच. कारण ती मांगल्य आणि सौख्याचं प्रतीक आहे. दीपज्योती नमोऽस्तुते असं शुभंकरोतीमध्येही म्हटलं गेलं आहे. मात्र दक्षिण दिशेला वात करुन ही पणती लावू नये अशी मान्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)