Diwali Horoscope Today, 1st November 2024 : नवीन महिन्याच्या सुरुवातीला आज, १ नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आहे आणि शुक्रवार आहे. अमावस्या तिथी आज संध्याकाळी ६.१७ पर्यंत राहील. आज स्नानदान श्राद्धाची अमावस्या आहे. आज सकाळी १०.४१ पर्यंत प्रीति योग असणार आहे, त्यानंतर आयुष्मान योग सुरु होईल. तसेच आज रात्री ३.३१ पर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. आज चंद्र रात्रंदिवस तूळ राशीत भ्रमण करेल.आजच्या दिवशी सकाळी १०.४२ ते दुपारी १२.०४ मिनिटांपर्यंत राहू काळ असल्याने उर्वरित दिवस सुखकर होईल. आज मेष ते मीन राशींच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय ते पाहूयात…
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या दिवसाचे राशीभविष्य ( November 1st Zodiac Sign Horoscope)
v
v
मेष:-नातेवाईक भेटीला येतील. आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.
वृषभ:-आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.
मिथुन:-कौटुंबिक आनंद मिळवाल. घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.
कर्क:-घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका.
सिंह:-बोलण्यातून प्रभाव पाडाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या.
कन्या:-आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल. कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या.
तूळ:-पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. खरेदीचा मनापासून आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.
वृश्चिक:-मानसिक चंचलता जाणवेल. आपल्या मतांवर ठाम राहावे. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल.
धनू:-घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.
मकर:-कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.
कुंभ:-आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. पोटाचे विकार संभवतात.
मीन:-अति विचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर