November Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार येणारा नोव्हेंबर महिना खूप शुभ मानला जाणार आहे. या महिन्यात दिवाळीसह काही मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन देखील पाहायला मिळेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या महिन्यात भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र धनु राशीत प्रवेश करणार असून सूर्य वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच बुधदेखील वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार असून शनी मार्गी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने नोव्हेंबरमध्ये शश राजयोग, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग, धनलक्ष्मी राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग, बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच चंद्राची काही ग्रहांबरोबर युती होईल ज्यामुळे गजकेसरी, महालक्ष्मी यांसारखे काही राजयोग निर्माण होतील. ज्याचा शुभ प्रभाव ४ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

तीन राशी होणार मालामाल

वृषभ

नोव्हेंबर महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास मानला जाईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचला. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. जोडीदाराचा सहयोग प्राप्त होईल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनादेखील नोव्हेंबर महिना खूप सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. कुटुंबीयांचीही साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. कुटुंबीयांसह पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. कामाच्या ठिकाणच्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नात्यामध्ये सुखाचे क्षण येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.

हेही वाचा: येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा

U

वृश्चिक

नोव्हेंबर महिन्यातील राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मान-सन्मान वाढ होईल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 24 horoscope three zodiac signs will get a lot of money love and respect in the month of november sap