Aarti for Goddess Lakshmi : सध्या देशभरात दिवाळी उत्साहाने साजरी केली जात आहे. पाच दिवसांच्या दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा व आराधना केली जाते. लक्ष्मी पुजनादरम्यान लक्ष्मीचे स्त्रोत व आरती गायली जाते पण तुम्हाला लक्ष्मीच्या आरत्या माहितेय का? आज आपण काही निवडक लक्ष्मीच्या आरत्या जाणून घेणार आहोत.

१. ओम जय लक्ष्मी माता, मैय्या जय लक्ष्मी माता
तुमको निस दिन शेवत, हर विष्णु धाता
ओम जय लक्ष्मी माता…

uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Saturn-Jupiter Retrograde
तब्बल ५०० वर्षानंतर दिवाळीच्या काळात शनी-गुरू होणार वक्री; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् बक्कळ पैसा
November Astrology
नोव्हेंबर महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा! ऐन दिवाळीत मिळणार अपार धनसंपत्ती
vidhan sabha election 2024, Mira Bhayandar,
मुख्यमंत्र्यांची साथ आमदार गीता जैन यांना ठरली मारक ?
Kojagiri Purnima will shine like silver the fate of people of this zodiac sign Better days will come
कोजागरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब! चांगले दिवस येणार
Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख
Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती

उमा रामा ब्राह्मणी, तुमी जग माता
सूर्य चंद्रमा ध्यावत, नारद ऋषी गाता
ओम जय लक्ष्मी माता…

दुर्गा रूप निरंजनी, सुख संपती दाता
जो कोई तुमको ध्यावत, रिद्धी सिद्धी धन पता
ओम जय लक्ष्मी माता…

तुम पाताल की वासिनी, तुम ही शुभ दाता
कर्म प्रभाव प्रकाशिनी, जग निधी की त्राता
ओम जय लक्ष्मी माता…

जिस घर में तुम रहती, सब सद्गुण अता
सब संभाव हो जाता, मान नाही घबरता
ओम जय लक्ष्मी माता…

तुम बिन यज्ञ ना होवे, वस्त्र ना कोई पता
खान पान का वैभव, सब तुमसे अता
ओम जय लक्ष्मी माता…

शुभ गुण मंदिर सुंदर, क्षीरोदधी जात
रत्न चतुरदास तुम बिन, कोई नहीं पता
ओम जय लक्ष्मी माता…

महालक्ष्मीजी की आरती, जो कोई जन गाता
उर आनंद समता, पाप उतर जाता
ओम जय लक्ष्मी माता…

ओम जय लक्ष्मी माता, मैय्या जय लक्ष्मी माता
तुमको निस दिन शेवत, हर विष्णु धाता
ओम जय लक्ष्मी माता…

हेही वाचा : ५०० वर्षांनी दिवाळीला शनि आणि गुरुचा होणार दुर्मिळ संयोग! या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअमध्ये प्रगतीसह मिळेल पैसाच पैसा

२. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।

वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी…॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी…॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी…॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी…॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥

जय देवी जय देवी…॥

३. जय देवी जय देवी जय लक्ष्मीमाता
प्रसन्न होऊनिया वर देई आता ।। धृ०।।
विष्णुप्रिये तुझी सर्वांतारी सत्ता ।
धन दौलतदेई लक्ष्मीव्रत करिता ॥१॥
विश्वव्यापक जननी तुज एसी नाही।
धावसी आम्हालागी पावसी लवलाही ।।२।।
त्रैलोक्यधारिणी तू भक्ता लाभेसुखशांती ।
सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ॥३॥
वैभव एश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसी दान वरदे सदैव सौख्याचे ।।४।।
यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी।
प्रेमे भक्तासवेलोटांगण घाली ॥५॥

हेही वाचा : Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती

४. ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता।
प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारिसी तू भक्तां ।। धृ० ।।

पूर्वजन्मीची व्रतपुण्याई, वैभव राणीला । गर्व धनाचा तिला, विसरली लक्ष्मीमातेला ।
अपमानाने शाप दिला मग, आली दरिद्रता।
प्रसन्न वदने प्रसन्न होसी, तारिसी तू भक्तां ।। प्रसन्न वदने० ।।१।।

व्रत केल्याने प्रसन्न झाली, देवी राणीला। दैन्य दुःख ते दूर करोनी, मन निर्मल झाले । शामबाला दासीलाही, पावन हो माता ।। प्रसन्न वदने ० ।।२।।

पूजा करिती लक्ष्मीमातेची, नेमधर्म धरूनी। मनोकामना पूर्ण करील ती, अघटित हो करणी। केळकर गुरुजी रमला, गुण गाता गाता ।। । प्रसन्न वदने, प्रसन्न होसी । तारिसी तू भक्तां ।।३।।

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.