Budh Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करते. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. १ नोव्हेंबर रोजी व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जाणार बुध ग्रह विशाखा नक्षत्रातून अनुराधा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. अनुराधा नक्षत्राच्या स्वामी ग्रह शनी आहे. ज्योतिषशास्त्रात बुध आणि शनीला मित्र ग्रह मानले जाते. त्यामुळे बुधाचा अनुराधा नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. या काळात त्या राशींच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तसेच त्यांच्या धन-संपत्तीत वाढदेखील होईल.
बुध करणार मालामाल
मिथुन
बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कुटुंबात आनंदी आनंद होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील
कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींनाही बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील.
तूळ
बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशींच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बँक बॅलन्स वाढेल. करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात सुखमय क्षण व्यतीत कराल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणच्या नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नात्यामध्ये सुखाचे क्षण येतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)