Diwali 2024 Date And Time In India: हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. कॅलेंडरनुसार, प्रत्येक कार्तिक महिन्याच्या अमावस्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. या दिवशी लोक लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान गणेशाची विशेष पूजा करतात. यंदा ३१ ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या दिवशी शश महापुरुष राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
दिवाली तिथी 2024 (Diwali Tithi 2024)
वैदिक पंचांगानुसार, यावर्षी अमावस्या तिथीची सुरुवात ३१ रोजी दुपारी ३:२२ वाजता होईल आणि १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:२२ वाजता समाप्त होईल. ३१ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणे आणि लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाणार आहे.
शश राजयोग निर्माण होणार
दिवाळीच्या दिवशी शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान होतील. त्यामुळे शश नावाचा राजयोग तयार होईल.
हेही वाचा – दिवाळीच्या आधी बुध-शुक्र तयार करणार मोठा राजयोग! ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअर आणि व्यवसायात मिळणार यश
या राशीच्या लोकांसाठी दिवाळी ठरणार शुभ
दिवाळीला शश राजयोग तयार होत आहे, जो मेष, वृषभ, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या दिवाळीत तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदार्या मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तेथे एखादा मोठा व्यापार व्यवहार होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात कमाईच्या अनेक उत्तम संधी मिळतील आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल.
दिवाळीचे धार्मिक महत्त्व
दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केल्याने सुख-समृद्धी येते. तसेच दिवाळीच्या दिवशी प्रभू राम लंका जिंकून अयोध्येला परतले. या दिवसापासून दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. तसेच प्रभू रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित केले जातात. दिवाळीच्या रात्री केलेला उपाय यशस्वी होतो, अशी श्रद्धा आहे.