Diwali 2024 Shash Mahapurush Rajyog: दिवाळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदाच्या दिवाळीत अनेक शुभकार्ये होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी बुधादित्या राजयोगासह शश राजयोग तयार होत आहे. जेव्हा शनि त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो. याचबरोबर तूळ राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होत आहे, ज्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच या काळात आयुष्मान योगही जुळून येत आहे. अशाप्रकारे तब्बल ३० वर्षांनंतर एकाचवेळी तीन राजयोग तयार होत असल्याने त्याचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर खूप शुभ परिणाम होणार आहे. काही राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा असेल. अशा स्थितीत या राशींना धन आणि समृद्धी मिळू शकते आणि प्रत्येक कामात यश मिळू शकते. दिवाळीत शुभ राजयोग तयार झाल्याने कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो जाणून घेऊ…

दिवाळीत तीन राजयोगाने ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात होईल भरभराट (Diwali 2024 Rajyog)

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभाबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांवर शनिदेव तसेच सूर्य आणि बुध यांची विशेष कृपा असेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे सुख येऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतात. या काळात जीवनात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ मानला जातो. भविष्यात तुम्हाला चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक उत्तम संधी मिळू शकतात. रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. व्यवसाय किंवा नोकरीत तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर मोठ्या संधी मिळवू शकता आणि आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकता.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

वृषभ

बुधादित्य आणि शश राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या मेहनतीचे आता चांगले फळ मिळू शकते. तुम्हाला नोकरीत प्रमोशनबरोबर चांगले प्रोत्साहन मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्हाला अनेक प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील, त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. आरोग्याबाबतही अनेक चांगले बदल घडू शकतात.

Read More Astrology Related News : Shani Margi : दिवाळीनंतर शनीदेव ‘या’ राशींच्या लोकांना करणार श्रीमंत? नोकरी, व्यवसायात मिळू शकतो बक्कळ पैसा अन् यश

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना दिवाळीत तयार होणाऱ्या तीन राजयोगांमुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते, तसेच भरपूर आर्थिक लाभदेखील होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. याचबरोबर मुलांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते. तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी दिसाल, नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही समाधानी दिसू शकता. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही करत असलेले कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

Story img Loader