Diwali 2024 Shash Mahapurush Rajyog: दिवाळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदाच्या दिवाळीत अनेक शुभकार्ये होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी बुधादित्या राजयोगासह शश राजयोग तयार होत आहे. जेव्हा शनि त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो. याचबरोबर तूळ राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होत आहे, ज्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. तसेच या काळात आयुष्मान योगही जुळून येत आहे. अशाप्रकारे तब्बल ३० वर्षांनंतर एकाचवेळी तीन राजयोग तयार होत असल्याने त्याचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर खूप शुभ परिणाम होणार आहे. काही राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा असेल. अशा स्थितीत या राशींना धन आणि समृद्धी मिळू शकते आणि प्रत्येक कामात यश मिळू शकते. दिवाळीत शुभ राजयोग तयार झाल्याने कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा