Horoscope Today in Marathi : खूप दिवसांपासून आपण सगळेच दीपावली या सणाची आतुरतेने वाट पाहत होतो. तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या खास दिवशी सुगंधित उटणे लावून स्नान करण्यात येते. आज गुरुवारी चित्रा नक्षत्र रात्री १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच विश्कंभ योग ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर दिवाळीचा पहिला दिवस १२ राशींसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३१ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. स्थावर विषयक कामे होतील. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.

वृषभ:- कामे निर्भयपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवा.

मिथुन:- तुमच्यामुळे समोरची व्यक्ति नाराज होऊ शकते. औपचारिकतेत अडकून राहू नका. अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.

कर्क:- भावंडांची नाराजी सहन करावी लागेल. निसर्गाबद्दल दक्षता बाळगा. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

सिंह:- परमार्थाची भावना वाढीस लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा दबाव वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

कन्या:- आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. वाणीवर संयम ठेवा.

तूळ:- नवीन गोष्टीबद्दल आवड वाढेल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणी जागवल्या जातील.

वृश्चिक:- आज कमाईपेक्षा जास्त खर्च कराल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. छुपे शत्रू माघार घेतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल.

धनू:- ज्ञानात भर पडेल. मेहनतीने इच्छा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा. धार्मिक कामात मन रमेल.

मकर:- वारसा हक्काचे काम होईल. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. चोरांपासून सावध राहावे. जीवनसाथीची मनाजोगी साथ मिळेल.

कुंभ:- आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्न वाढीस लागेल. उत्तम मार्गदर्शन लाभेल. कोणालाही कर्ज देणे टाळावे.

मीन:- ईश्वराप्रती श्रद्धा बाळगा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक कामासाठी प्रवास केला जाईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुना आजार त्रास देऊ शकतो.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2024 special aries to pisces rashi bhavishya in marathi who get money love and new way to success asp