Diwali Laxmi Pujan Horoscope Today, 1st November 2024 : नवीन महिन्याच्या सुरुवातीला आज, १ नोव्हेंबरला कार्तिक कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आहे आणि शुक्रवार आहे. अमावस्या तिथी आज संध्याकाळी ६.१७ पर्यंत राहील. आज लक्ष्मीपूजनचा सण आहे. यानिमित्ताने घरोघरी, कार्यालयांत आणि कारखान्यांमध्ये लक्ष्मीची पूजा – अर्चा केली जाईल. हा दिवस नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. आज सकाळी १०.४१ पर्यंत प्रीति योग असणार आहे, त्यानंतर आयुष्मान योग सुरु होईल. तसेच आज रात्री ३.३१ पर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. आज चंद्र रात्रंदिवस तूळ राशीत भ्रमण करेल.आजच्या दिवशी सकाळी १०.४२ ते दुपारी १२.०४ मिनिटांपर्यंत राहू काळ असल्याने उर्वरित दिवस सुखकर होईल. आज लक्ष्मी पूजनाच्या (Laxmi Pujan 2024) दिवशी मेष ते मी न राशींच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय ते पाहूयात…

नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या दिवसाचे राशीभविष्य ( Laxmi Pujan 2024 November 1st Zodiac Sign Horoscope)

Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Diwali Astrology | Guru Shukra Yuti 2024
Diwali Astrology : दिवाळीच्या दिवशी ‘या’ राशींना होणार आकस्मिक धनलाभ, गुरु आणि शुक्र बनवणार समसप्तक राजयोग
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Rashi Bhavishya On 31st October 2024
३१ ऑक्टोबर पंचांग: दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार? व्यावसायिक क्षेत्रात प्रगती ते अचानक धनलाभ होणार; वाचा १२ राशींचे भविष्य

मेष:- नातेवाईक भेटीला येतील. आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.

वृषभ:- आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.

मिथुन:- कौटुंबिक आनंद मिळवाल. घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.

कर्क:- घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका.

सिंह:- बोलण्यातून प्रभाव पाडाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या.

कन्या:- आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल. कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

तूळ:- पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. खरेदीचा मनापासून आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.

वृश्चिक:- मानसिक चंचलता जाणवेल. आपल्या मतांवर ठाम राहावे. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल.

धनू:- घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.

मकर:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.

कुंभ:- आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. पोटाचे विकार संभवतात.

मीन:- अति विचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर