Shani Maharaj Margi In Diwali: ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचे स्थान आहे. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो त्यामुळे त्यांचा बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष ६ महिने लागतात. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. २०२३ हे वर्ष तर शनीच्या महत्त्वपूर्ण हालचालींचे वर्ष मानले जाते. यंदाच्या दिवाळीच्या आधी शनीदेव कुंभ राशीतुन मार्गी होणार आहेत. सध्या शनीदेव उलट म्हणजे वक्री अवस्थेत चाल करत आहेत अशातच त्यांची चाल बदलल्याने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीत दिवाळीआधी पैशाचा बंपर धमाका आहे का, जाणून घेऊया..
१० नोव्हेंबरपर्यंत शनीदेव ‘या’ राशींच्या नशिबाला देणार दिवाळीचं तेज
वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)
आपल्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. मात्र कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. त्यातून जीवनांतील आनंद हरवेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल. अशा वेळी मायेची नाती खूप महत्त्वाची मोलाची ठरतील. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मात्र मैत्री जपा.
कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)
कर्क राशीला शनी आठवा येत आहे, पण तो कुंभ राशीत असल्यामुळे संकटावर मात करण्याची हिंमत जरूर येईल. विशेषत: ज्येष्ठ लोकांनी विशेष काळजी घ्यावी. काहीशी चंचलता लहरीपणा वाढेल त्यामुळे निर्णय घेण्यातील ठामपणा हरवू नका. कारण सार्वजनिक जीवनांत आपले हसे होऊ नये. लोक प्रवाहाच्या विरोधात बोलणे. पुरोगामी असल्याचा आव आणणे अतिस्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरुप देणे टाळा. परंतू हा शनी गुरुच्या शुभयोगात येत असल्याने खूपशी स्थिती बदलेल. उत्साह वाढेल. आर्थिक, मानसिक बळ वाढेल जीवनांत एक सुसुत्रता प्राप्त होईल.
कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)
कन्या राशीला शनी षष्ठात आणि तो ही स्वगृही असल्याने त्यामुळे कधी कधी विरोधीपक्षामुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येतो. असा काहीसा प्रकार या राशीबाबत दिसून येईल. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. नवनवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. मात्र भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)