Diwali Padwa 2024: कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, असे म्हणतात. यंदाचा दिवाळी पाडवा २ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ दिन मानला जातो. त्यामुळे पाडवा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. पण, पाडव्याला पत्नीने आपल्या पतीचे औक्षण करण्यामागे नेमकं कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती स्वानंद पुणेकरगुरुजी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

बलिप्रतिपदा (पाडवा) साजरा करण्यामागचे कारण

पौराणिक कथेनुसार असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जायचा. पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळी राजा हा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता. मात्र, त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. तर माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की, मग माणसाची अधोगती सुरू होते. बळी राजाचेसुद्धा तेच झाले आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामनावतार म्हणून बटूचे रूप धारण केले आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.

Happy Dhantrayodashi 2024 wishes in marathi | dhanteras 2024 Wishes
Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीनिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; ही घ्या यादी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
How Many to Light for Prosperity and Joy on Dhanteras narak chaturdashi and lakshmi pujan
Diwali 2024 : धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किती दिवे लावतात? जाणून घ्या सविस्तर
Vasubaras 2024 Easy rangoli for vasubaras easy cow rangoli for Diwali rangoli video
Vasubaras 2024: आकर्षक रांगोळी काढून साजरी करा वसुबारस; सोप्या पद्धतीने काढा गोमुख आणि वासरू, पाहा VIDEO
How To Make Poha Chakli
Diwali Special Chakli Recipe : नेहमीच्या चकलीला द्या थोडा ट्विस्ट, यंदा दिवाळीत बनवा पोह्यांची कुरकुरीत चकली; वाचा साहित्य, कृती
diwali preparation at home
Diwali 2024 : आली माझ्या घरी ही दिवाळी!
Dev Uthani Ekadashi 2024 Date in Marathi | Kartiki Ekadashi 2024 Date
Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?

बळी राजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात ते बळी राजासमोर उभे राहिले. या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामनावतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी लोक व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळी राजाने आपले डोके पुढे केले. तीन पावलांमध्ये विष्णूंनी बळी राजाकडून सर्व काही काढून घेतले. परंतु, बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी पाताळाचे राज्य दिले.

या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात, आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले. भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीचे औक्षण करते.

हेही वाचा: Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

पाडव्याचा मुहूर्त

शुभ मुहूर्त : सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

तसेच सकाळी ५ ते ८ पर्यंत अमृत मुहूर्त आणि दुपारी ३ वाजून १२ मिनिटांपासून ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त असेल.

या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत मुहूर्त असेल.