Mythological Facts In Hindu Culture: हिंदू संस्कृतीनुसार गायीच्या पोटात ३३ कोटी देव- देवतांचा वास असल्याचे आपण ऐकलेच असेल. अगदी पुरातन काळापासून याबाबत अनेक वाद- विवाद आहेत. भारतातील मंदिरांची संख्या, व्रत वैकल्य, सणांची रेलचेल पाहता ३३ कोटी देव खरंच असू शकतात यामध्ये काही शंका वाटत नाही. पण जर हे ३३ कोटी देव असतील तर त्यांची नावं काय? त्यांची मंदिरं कुठे आहेत? त्यांची पूजा होते का, हो तर, कशी केली जाते? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. यावर वेद व पौराणिक कथांमध्ये सविस्तर उत्तर देण्यात आले आहे . आज आपण याच ३३ कोटी देवतांबद्दल फार लोकांना माहित नसलेली माहिती जाणून घेणार आहोत..

ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पंचदेवता असल्याचे पुराणात सांगण्यात आले आहे. यापैकी ब्रम्ह हे सृष्टीचे निर्माते असून महादेव म्हणजेच शिव हे सृष्टीचे पालनकर्ते म्हणून ओळखले जातात. शक्तीचे स्त्रीचे (देवीचे) रूप मानले जाते. याच पंचदेवतांनी सृष्टी रक्षणासाठी ३३ अन्य देवतांची नेमणूक केल्याचे सांगितले जाते.

R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mukta barve shared special post for naach ga ghuma
“मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, कारण…”, ‘नाच गं घुमा’ला भरघोस यश मिळत असताना मुक्ता बर्वे आहे तरी कुठे? म्हणाली…
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Deepinder Goyal Success Story
Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी
Ration Card e-KYC process in marathi
रेशनकार्डधारकांनो ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा KYC अन्यथा धान्य मिळणं होईल बंद; कशी करायची केवायसी? घ्या जाणून

मुळात ३३ कोटी हा शब्द ३३ कोटि असा लिहिला जातो. इथे ‘ट’ ला पहिली वेलांटी आहे त्यामुळे या शब्दाचा अर्थ संख्यावाचक नसून विशेषणात्मक आहे. कोटि म्हणजे प्रकार त्यामुळेच ३३ कोटि या शब्दाचा अर्थ ३३ करोड किंवा कोटी असा नसून ३३ प्रकार असा आहे.

11: 11 या वेळेत मागितलेली इच्छा पूर्ण होते? काय सांगतं अंकशास्त्र, जाणून घ्या

३३ कोटि देवतांची नावे काय?

३३ कोटि देवतांमध्ये ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती आहेत.

  • बारा आदित्यांची नावे : अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.
  • अकरा रुद्रांची नावे : मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
  • अष्टवसूंची नावे : आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास.
  • एक इंद्र.
  • एक प्रजापती

Vastu Shastra: देवासमोरील दिवा विझणं खरंच अशुभ असतं? अशा वेळी काय करावं? पौराणिक उत्तर जाणून घ्या

(टीप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारित असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

Story img Loader