वास्तुशास्त्रानुसार जर घरातील झोपण्याच्या खोलीत कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष असल्यास घरात नेहमीच नकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरांमध्ये वास्तुदोष असतो त्या घरांमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान, कामामध्ये अपयश, अडचणी, आजारपण तसेच घरातील सदस्यांमध्ये खटके उडत राहतात. घराच्या मुख्यद्वारानंतर झोपण्याची खोली म्हणजेच बेडरूम हे सर्वात खास असते. येथे दिवसभराच्या थकव्याला दूर सारून व्यक्ती एक नवी ऊर्जा प्राप्त करते. अशातच या खोलीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा वास्तुदोष नसावा.

झोपण्याची खोली कशी असावी ?

वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रमुख ज्या खोलीत झोपतो त्या खोलीचा पलंग नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला असावा. याव्यतिरिक्त पती-पत्नीची बेडरूम ही उत्तर-पश्चिम भागात असावी. या दिशेला खोली असल्‍याने आपसी नातेसंबंध अधिक घट्ट होतात. पती-पत्नीने ईशान्येकडे खोलीत बेड ठेवणे टाळावे.

रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

बेडरूमसाठी वास्तु नियम

बेडरूममध्ये कधीही देवघर नसावे.

बेडरूमच्या भिंतींवर कधीही आक्रमक जनावरांचे फोटो लावू नयेत.

बेडरूममध्ये पलंगाच्या शेजारी कधीही कोणते धार्मिक ग्रंथ ठेवून झोपू नये.

वास्तूनुसार बेडरूमच्या कोणत्याही कोपऱ्यावर आरसा नसावा. जर आरसा ठेवला असेल तर झोपताना झाकून ठेवा.

तुमचा पलंग कधीही बेडरूमच्या दरवाजाजवळ नसावा. त्यामुळे घरमालकाच्या मनात अशांतता व व्याकुळता राहते.

जर बेडरूममध्ये स्नानगृह असेल तर त्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.

पलंगाखाली रद्दी किंवा कचरा यांसारख्या वस्तू कधी चुकूनही ठेवू नका.

बेडरूमच्या भिंती कधीही पांढर्‍या किंवा लाल नसाव्यात. गडद रंगापेक्षा हलका रंग चांगला असतो. हिरवा, गुलाबी किंवा आकाशी रंग चांगली छाप सोडतो, खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

पती-पत्नीमध्ये मतभेद असल्यास झोपताना डोक्याजवळ बासरी ठेवल्यास फायदा होईल. वैवाहिक नात्यात गोडवा आणण्यासाठी उत्तर दिशेला नाचणारा मोर किंवा राधा-कृष्ण आलिंगन देणारे चित्र ठेवावे.

ज्या जोडप्यांना संतती हवी आहे त्यांनी शयनकक्षात श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचे किंवा गाय-वासराचे चित्र लावावे.

वास्तूनुसार, नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपा, जेणेकरून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रानुसार तुम्हाला दीर्घ आणि गाढ झोप घेता येईल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)