सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने ते भक्तांना आशीर्वाद देत त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी मदत करतात. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या प्रभावामुळे काल सर्प दोष निर्माण होतो. भगवान शिवाची पूजा केल्याने काल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो आणि या दोषामुळे निर्माण होणार्या समस्या दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. काल सर्प योगात काय होते, कालसर्प योगाचे तोटे, काल सर्प दोष आणि उपासना पद्धतीचे फायदे जाणून घेऊया.
काल सर्प दोष म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रात काल सर्प दोष हा अशुभ आणि घातक योग मानला जातो. अशा प्रकारे, असे मानले जाते की सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्य मध्य येतात व्यक्तीच्या जन्म पत्रिकेत काल सर्प दोष तयार होतो.
(हे ही वाचा: Astrology: मेष राशीत राहुचे संक्रमण! ‘या’ ४ राशींना होणार फायदा)
काल सर्प दोषामुळे होणारे नुकसान
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष आढळतो त्याला खूप संघर्ष करूनच सर्व काही मिळते. अशा लोकांना प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मानसिक ताण, अज्ञात भीती, संभ्रमही निर्माण होतो. नोकरी, करिअर आणि व्यवसायातही चढ-उतार पाहायला मिळतात.
(हे ही वाचा: Zodiac Signs: ‘या’ ४ राशीचे लोक कोणताही निर्णय घेतात अतिशय हुशारीने!)
कालसर्प दोषाचे फायदे
कालसर्प दोष देखील काही बाबतीत फायदेशीर मानला जातो. राहू आणि केतू हे देखील जीवनातील अचानक घडणाऱ्या घटनांचे कारक मानले जातात. त्यामुळे ते जीवनात शुभ परिणामही देतात. जेव्हा काल सर्प दोष होतो तेव्हा माणूस खूप मेहनती असतो. अशा व्यक्ती हिंमत हरत नाहीत आणि यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. काल सर्प दोष अनेक प्रसिद्ध आणि महापुरुषांच्या कुंडलीत आढळतो. त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही.काल सर्प दोषाचा उपाय केल्यावर या दोषाचा प्रभाव कमी होऊन शुभ परिणाम प्राप्त होतात.
(हे ही वाचा: Shani Gochar 2022: शनिदेव राशी बदलणार! ‘या’ ३ राशींना होऊ शकतो धनलाभ)
कालसर्प दोषाची पूजा
सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने कालसर्प दोषात शांती मिळते. सोमवारी सकाळी लवकर उठून भगवान शंकराचे दर्शन घ्यावे. यानंतर स्नान करून भगवान शंकराची आराधना सुरू करा. सोमवारी भगवान शंकराचा जलाभिषेक करा आणि भगवान शंकराला प्रिय वस्तू अर्पण करा. ओम नमः शिवाय या शिव मंत्राचा जप करा.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)