Holi 2022: होळी हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील प्रतिपदेला साजरा केला जातो. याच्या एक दिवस आधी फाल्गुन पौर्णिमेला छोटी होळी असते. या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केले जाते. होळीपासूनच वसंत ऋतु सुरू होतो, असे मानले जाते. यावेळी होलिका दहन आज शुक्रवार, १७ मार्च रोजी होणार आहे. तर १८ मार्चला होळी खेळली जाणार आहे. असे मानले जाते की होलिका दहनानंतर प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखे दूर होतात. चला जाणून घेऊया होलिका दहनाच्या वेळी राशीनुसार काय अर्पण करावे आणि किती वेळा प्रदक्षिणा करावी.
मेष (Aries): मेष राशीच्या लोकांनी होलिकेच्या अग्नीत गूळ अर्पण करावा. यासोबतच होलिका दहनाच्या अग्निची ९ वेळा प्रदक्षिणा करावी.
वृषभ (Taurus): वृषभ राशीनुसार होळीमध्ये साखरेची मिठाई अर्पण करा आणि ११ वेळा प्रदक्षिणा करा.
मिथुन (Gemini): मिथुन राशीच्या लोकांनी होलिकेच्या अग्नीत कच्च्या गव्हाचे कर्णफुले करून अर्पण करावीत आणि ७ वेळा प्रदक्षिणा घालावी.
(हे ही वाचा: Holi 2022: होळी का पेटवली जाते? जाणून घ्या कारण)
कर्क (Cancer): पांढरे तीळ आणि चाळ अग्नीत अर्पण करा. तसेच, होलिकेची २८ वेळा प्रदक्षिणा करा.
सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांनी लोबान किंवा होल्बन अर्पण करावे. आणि नंतर होलिकाची प्रदक्षिणा २९ वेळा करावी.
कन्या (Virgo) : होलिका दहनाच्या वेळी अग्नीत सुपारीची पाने आणि हिरवी वेलची अर्पण करा. तसेच होलिकेची ७ वेळा प्रदक्षिणा करावी.
(हे ही वाचा: Hoil 2022: यंदा कधी साजरी होणार होळी? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त)
तूळ (Libra): तूळ राशीच्या लोकांनी अग्नीत कापूर अर्पण करावा आणि नंतर होलिकेची २१ वेळा प्रदक्षिणा करावी.
वृश्चिक (Scorpio) : होलिका दहनाच्या वेळी अग्नीत गुळाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर २८ वेळा होलिकाची प्रदक्षिणा करावी.
धनु (Sagittarius) : होलिका दहनाच्या अग्नीत हरभरा डाळ अर्पण करा. नंतर २३ प्रदक्षिणा करावी.
(हे ही वाचा: Happy Holi Marathi Message: होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा मेसेज!)
मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांनी अग्नीत काळे तीळ अर्पण करावे आणि नंतर १५ वेळा प्रदक्षिणा करावी.
कुंभ (Aquarius) : काळी मोहरी अर्पण करा आणि अग्नीची २५ वेळा प्रदक्षिणा करा.
मीन (Pisces) : होलिका दहनाच्या अग्नीत पिवळी मोहरी अर्पण करा. यानंतर ९ वेळा होलिकेची प्रदक्षिणा करावी.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)