होळी हा सण हिंदू धर्मात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वैदीक पंचांगानुसार होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होते. होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रीय उपाय करण्याचे विशेष महत्त्व आहे. कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय परिणामकारक ठरतात अशी मान्यता आहे. या उपयांमुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करू शकते, असं हिंदू शास्त्रात सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊया या उपायांबद्दल…
होलिका दहनाची वेळ रात्री ०९.०६ ते १०.१६ पर्यंत आहे. मात्र या काळात भद्राची शेपूट असेल. शास्त्रानुसार होलिका दहन हे भद्राच्या अंशिक सावलीत करता येते. त्यामुळे १७ मार्च रोजी ९ वाजून ६ मिनिटांपासून होलिका दहन करता येईल. कारण या दिवशी भद्राची छाया समाप्ती रात्री उशिरा १ वाजून १२ मिनिटांनी होईल. ज्यांना भद्रानंतर होलिका दहन करायचे असेल, तर त्यांच्यासाठी मुहूर्त रात्री उशिरा १ वाजून १२ मिनिटे ते १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांपर्यंत आहे. होळाष्टकचा काळ सर्वात अशुभ मानला जातो. शुभ कार्य करण्यास मनाई आहे. होलाष्टक हा फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेपर्यंत चालतो. यावर्षी होलाष्टक १० मार्च रोजी पहाटे २ वाजून ५६ मिनिटांनी सुरू झाला आहे, १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी संपेल. या ८ दिवसांत अष्टमी तिथीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि राहू पौर्णिमेला असतो. यामुळे त्या वेळी कोणतेही शुभ कार्य करत नाहीत.
हिंदू शास्त्रानुसार पुढील उपाय ठरतात प्रभावी
गोमती चक्र: होलाष्टकादरम्यान ८ गोमती चक्रांची दररोज पूजा करावी. यानंत गोमती चक्रावर ‘नमः शिवाय ‘मंत्राने अभिमंत्रित करा. यानंतर आठव्या दिवशी ही चक्रे शिवलिंगावर अर्पण करावीत. हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
भस्म: होलिका दहनातील भस्म अतिशय शुभ मानलं जाते. ही राख घरात आणून प्रत्येक कोपऱ्यात शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तसेच ही राख ऑफिस किंवा दुकानाच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी कागदात बांधून ठेवावी. असे केल्याने व्यवसाय चांगला चालतो. तसेच तिजोरी पैशांनी भरलेली आहे.
राहू आणि केतू दोषापासून मुक्तता: एखाद्याच्या कुंडलीत राहू-केतू किंवा कालसर्प ग्रह दोष असल्यास होळीची भस्म पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावी. या उपायाने ग्रह दोष दूर होऊन प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.