आपल्या काही लहान-मोठ्या चुका आयुष्यातील समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. वास्तू शास्त्रानुसार, वास्तूशी निगडित चुकांमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामुळे घरामध्ये समृद्धी नांदत नाही. याशिवाय घरातील व्यक्ती कर्जबाजारी होते. तिला कर्ज फेडणे कठीण होऊन बसते. वास्तू शास्त्रात अनेक चुकांबद्दल सांगितले आहे. जाणून घेऊया अशा ५ चुका ज्यांच्यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात आणि गरिबी येऊ शकते.
वास्तुशी संबंधित ‘या’ चुका गरीबीचे कारण बनू शकतात
- बहुतांश घरांमध्ये कचरा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे डस्टबीन घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ ठेवलेले असतात. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी क्रोधित होते. या चुकीमुळे माणूस कंगाल होऊ शकतो, असे वास्तुतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे.
पायात काळा धागा घातल्याने कोणते फायदे होतात माहित आहे का? जाणून घ्या धारण करण्याची योग्य पद्धत
- बरेच लोक घरी बिछान्यावर आरामात बसून जेवतात. याबाबत वास्तुशास्त्रात कडक चेतावणी देण्यात आली आहे. वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की या एका चुकीमुळे माणूस गरीब होऊ शकतो. याशिवाय ही चूक कुटुंबाच्या सुख-समृद्धीमध्ये अडथळे निर्माण करते.
- वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये घाण आणि उघडी भांडी ठेवणे अशुभ आहे. जर काही कारणास्तव तुम्ही रात्री उष्टी भांडी साफ करत नसाल तर ती स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री, स्वयंपाकघर व्यवस्थित साफ केल्यानंतर, झोपायला जावे. असे न केल्याने जीवनात आर्थिक संकट येते.
- शास्त्रात दानाला विशेष महत्त्व दिले आहे. तथापि, काही गोष्टी संध्याकाळी इतरांना देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान करू नये, कारण असे केल्याने घरामध्ये गरिबी येते.
- वास्तुशास्त्रानुसार रात्री बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवू नयेत. बाथरूममध्ये किमान एक बादली पाण्याने भरली पाहिजे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. हे तुम्हाला आर्थिक संकटातूनही वाचवते.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)