Palmistry : हातावरील रेषा व्यक्तीचा स्वभाव, लग्न, प्रेम संबंध, आरोग्य आणि करिअरविषयी सांगतात. हस्तरेखा शास्त्रानुसार, हातावरील रेषांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कधी तुमच्या मनात असा विचार आला का, की तुमचे लग्न कधी होणार, आणि कोणाबरोबर तुमचे लग्न होणार? तुमचा प्रेमविवाह होणार की नाही? हस्तरेषा शास्त्रानुसार तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता.
विवाह रेषा
हस्तरेषा शास्त्रानुसार आपल्या हाताच्या करंगळीच्या खाली हृदय रेषा असते त्याच्यावर हाताच्या बाहेरच्या भागातून आतमध्ये येणारी रेषा असते, त्याला विवाह रेषा म्हणतात. जेव्हा ही रेषा लहान, स्पष्ट आणि गडद असते, तेव्हा ती शुभ मानली जाते. या लोकांचे प्रेम संबंध खूप रोमँटीक असतात. अशा लोकांना खूप चांगला जोडीदार मिळतो. विवाह रेषेजवळ त्रिशूलचे चिन्ह असणे शुभ मानले जाते. अशा लोकांना खूप प्रेम करणारा जोडीदार मिळतो.
केव्हा होणार विवाह?
असं म्हणतात, जेव्हा विवाह रेषा हृदय रेषेच्या अगदी जवळ असते, तेव्हा विवाह योग जुळून येण्याची शक्यता असते. अशा लोकांनी जीवनात खूप चढ उतार पाहावा लागतो. ज्या लोकांची विवाह रेषा करंगळीच्या जवळ आहे तर याचा अर्थ त्यांचे लग्न वयाच्या ३० व्या वर्षी किंवा ३० वर्षानंतर होऊ शकते.
लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज?
तुमच्या मनात अनेकदा असा प्रश्न आला असेल की तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज? जर तुमच्या विवाह रेषेवर वर्ग चिन्ह असेल तर तुमचे लव्ह मॅरेज होऊ शकते. त्याचबरोबर हातावर शुक्र पर्वत स्पष्ट दिसत असेल तर लव्ह मॅरेज होण्याची शक्यता आहे.
लग्नामध्ये कधी अडचणी येतात?
ज्या लोकांच्या विवाह रेषेवर दुसरी कोणती रेषा जात असेल तर त्याचा अर्थ आहे की लग्नाला उशीर होऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात. कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीत असेल तर लग्नामध्ये अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा : गुरुबळ वाढेल! ९ महिने देवगुरु ‘या’ राशींना प्रचंड श्रीमंती देणार? लक्ष्मी कृपेने घरात येऊ शकतो अमाप पैसा
ब्रेकअप कधी होऊ शकते?
जर तुमची विवाह रेषा अस्पष्ट आणि गडद असेल तर तुम्हाला ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो किंवा नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे.)