घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. याला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. याशिवाय घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने नक्कीच अर्पण केली जाते. विष्णूचे तुळशीवर खूप प्रेम आहे. याशिवाय ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे लक्ष्मीची कृपादृष्टी राहते. परंतु तुळशीचे रोप ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

  • तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही.

तुळशीची सुकलेली पाने चमकावणार नशीब; जाणून घ्या कसा करावा वापर

  • घरात तुळशीचे रोप लावणे पुरेसे नाही, तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. यासाठी रोज सकाळी आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा.
  • महिलांनी तुळशीला जल अर्पण करताना केस कधीही उघडे ठेवू नयेत. सुहासिनींनी नेहमी तुळशीला केस बांधून जल अर्पण करावे. शक्य असल्यास दुधात पाणी मिसळून अर्पण करावे.
  • रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करू नका. या दिवशी तुळस भगवान विष्णूसाठी उपवास करते, असे म्हणतात.
  • तुळशीच्या झाडाभोवती केर, घाण भांडी, पादत्राणे, झाडू किंवा कचरा चुकूनही ठेवू नका. तसेच तुळशीच्या झाडावर घाण पाणी कधीही पडणार नाही अशी व्यवस्था करा, अन्यथा तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. याशिवाय अनेक समस्याही येऊ शकतात.

‘या’ राशींसाठी भाग्यवान आहे सोन्याची अंगठी; आनंदाच्या मार्गातील अडथळे होतात दूर

  • तुळशीभोवती काटेरी झाडे लावू नका. अन्यथा, घरामध्ये अशुभ आणि नकारात्मकता वाढेल.
  • ज्या भांड्यात तुळशीचे रोप लावता त्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नका. तसेच तुळशीचे रोप टेरेसवर ठेवू नका. ते घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे.
  • संध्याकाळी तुळशीखाली दिवा ठेवल्यानंतर विझलेला दिवा काढायला विसरू नका.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)