आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक काळापासूनच हा दिवस अतिशय खास आहे. या दिवशी गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते. ध्यान केले जाते. यासोबत अनेक प्रकारच्या मंत्रांचा जप केला जातो. या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्वही सांगितले आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान आणि स्नान यांना खूप महत्व आहे.
दान केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान केले तर तुम्हाला अक्षय्य पुण्य मिळेल. जाणून घेऊया या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान केल्याने तुम्हाला अक्षय्य पुण्य आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल.
मेष : ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला लाल रंगाचे कपडे दान करावे. यामुळे आर्थिक संकट दूर होते.
वृषभ : या दिवशी या राशीच्या लोकांनी साखरेचे दान करावे. याशिवाय या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी घरातील मंदिरात तुपाची अखंड ज्योत लावावी.
Guru Purnima 2022 : गुरु पौर्णिमेला बनत आहेत ४ राजयोग; या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास मिळेल भाग्याची साथ
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा. यासोबतच मुगाच्या हिरव्या डाळीचे दान करणे देखील शुभ राहील. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.
कर्क : या लोकांनी गरीब आणि गरजूंना तांदूळ दान करावे. असे केल्याने तणावापासून आराम मिळतो.
सिंह : या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी गहू दान केल्यास त्यांची प्रतिष्ठा वाढेल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी.
तूळ : ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी लहान मुलींना खीर खाऊ घालावी. असे केल्याने यश आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
वृश्चिक : असे मानले जाते की वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी माकडांना हरभरा आणि गूळ खाऊ घालावा. तसेच गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व अभ्यास साहित्य दान केल्यास फायदा होईल.
धनु : गुरुपौर्णिमेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी मंदिरांमध्ये हरभरा दान करावे. यामुळे सुख समृद्धी मिळते.
मकर : या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेला ब्लँकेटचे वाटप करावे. त्यामुळे नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
कुंभ : वृद्धाश्रमातील वृद्धांना वस्त्र आणि अन्न दान करा. तसेच काळ्या उडदाचे दान करावे.
मीन : मीन राशीच्या लोकांनी या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना हळद आणि बेसनापासून बनवलेली मिठाई दान करावी. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)