Chanakya Niti Tips: आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगण्याच्या पद्धतींच्या पैलूंबाबत सांगितले आहे. त्यांनी आपला नीती ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीतीमध्ये मनुष्याच्या आयुष्य सोपे आणि सुखी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य सांगतात की, ”अनेकदा धन लाभ झाल्यानंतर लोक वाईट दिवस विसरतात आणि काही अशा चुका करतात, ज्यामुळे ते पुन्हा गरीब होऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाणक्य नीती सांगते की, वाईट काळात प्रत्येक व्यक्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, परंतु जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा तो धर्माकडे दुर्लक्ष करतो. अधिक पैशांच्या हव्यासापोटी तो अधर्माच्या मार्गावर जातो. अशी चूक करू नका, कारण असे करणाऱ्यांना लक्ष्मी आपला आशीर्वाद देत नाही आणि सुख-शांती लाभत नाही.

हेही वाचा – पुढील दोन आठवड्यात ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज! मुंबईसह राज्यातील पावसाचे रूप कसे असेल?

आचार्य चाणक्य सांगतात की, ”पैशाचा गर्व चांगल्या नात्यातही दुरावा घेऊन येतो, त्यामुळे कुटुंबात चुकूनही पैशाचा अभिमान दाखवू नका. पैसा आज आहे उद्या नाही, पण तुमचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी तुम्हाला मरेपर्यंत साथ देतील.”

पैसा मिळवण्यासाठी कधीही तुमचा स्वाभिमान पणाला लावू नका. असे केल्यास लोकं किंमत देत नाहीत. पैशाच्या लोभापायी स्वाभिमानाशी तडजोड करू नका.

हेही वाचा – Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ पाच गोष्टी दिसणे मानले जाते शुभ! चांगला काळ येण्याचे संकेत, मिळू शकते आनंदाची बातमी

चाणक्य नीती सांगते की, जेव्हा एखादी व्यक्ती धनवान असेल तेव्हा अनावश्यक पैसा खर्च करण्याऐवजी त्याने आपल्या कमाईतील काही भाग धर्माच्या कार्यात खर्च करावा. पैशाची उधळपट्टी माणसाला इतरांसमोर हात पसरायला भाग पाडते.

चाणक्य नीतीनुसार, तुमच्या पैशाचा वापर कधीही इतरांचे नुकसान करण्यासाठी करू नका. असे केल्याने श्रीमंतही गरीब होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont make these mistakes after getting know what chanakya neeti says snk