ज्योतिषशास्त्रात शनि, शुक्र आणि गुरू या ग्रहांना खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. असे म्हणतात, शनि, शुक्र आणि गुरु यांनी अशुभ फल दिल्यास जीवन उद्ध्वस्त होते. अशा परिस्थितीत नशीब माणसाला साथ देत नाही आणि मेहनतही त्याला यश मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे या ग्रहांना बळ देण्यासाठी त्याने काही काम टाळावेत. तसेच कुंडलीत हे ग्रह अशुभ स्थितीत असतील तर त्यांच्या शांतीसाठी काही उपाय करावेत. जाणून घेऊया गुरू, शुक्र आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी कोणत्या चुका करू नयेत.
या चुकांमुळे शनिदेव नाराज होतात
- कधीही कोणाशी खोटे बोलू नका, कोणालाही फसवू नका.
- कोणाचेही पैसे चुकीच्या मार्गाने हडप करू नका.
- कष्टकरी लोकांना त्रास देऊ नका किंवा त्यांचे शोषण करू नका.
- अपंग लोकांना त्रास देऊ नका किंवा त्यांची चेष्टा करू नका.
२४ तासांच्या अंतराने दोन ग्रह एकाच राशीमध्ये करणार संक्रमण; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शुभ वार्ता
गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी कधीही ‘हे’ काम करू नका
- गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम टाळायचे असतील तर ज्ञानी, गुरु, संत यांचा अपमान करू नका. गुरू हा ज्ञानाचा आणि शिक्षणाचा कारक आहे, त्यामुळे एखाद्याच्या शिक्षणात अडथळा आणल्यानेही गुरूला राग येऊ शकतो. तसेच कोणावरही टीका करू नका.
शुक्राचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी ‘या’ चुका कधीही करू नका
- शुक्र ग्रहाच्या कृपेने व्यक्तीला भौतिक सुखसोयी, प्रेम, ऐषाराम, जीवनातील प्रवासाचा आनंद मिळतो. शुक्र अशुभ फल देत असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य गरिबीत व्यतीत होते. तसेच त्याला आयुष्यात प्रेम मिळत नाही. त्यांचे वैवाहिक जीवनही चांगले राहत नाही.
- अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रेमात कधीही कोणाची फसवणूक करू नका. महिलांचा अपमान करू नका. पैशाच्या जोरावर कुणालाही दुखवू नका. चुकूनही पैशाची बढाई मारू नका.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)