Dream Astrology : झोप हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक असून, ती माणसांच्या प्रिय गोष्टींपैकी एक आहे. असे म्हणतात की, स्वप्ने बऱ्याच गोष्टींचे संकेत देतात. स्वप्नशास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात हनुमंत दिसत असेल, तर त्याचे अनेक चांगले-वाईट परिणाम आपल्या भविष्यावर दिसून येतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या ….

स्वप्नात पंचमुखी हनुमान दिसत असेल तर …

स्वप्नात पंचमुखी , दिसणे शुभ असते. स्वप्नशास्त्रानुसार पंचमुखी बजरंग दिसण्याचा अर्थ हा की लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात

हेही वाचा : Name Astrology : ‘या’ अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्तींना मिळतो अपार पैसा, खरे प्रेम आणि मोठे यश; या यादीमध्ये तुमचे नाव आहे का?

स्वप्नात हनुमंताचा प्रसाद तुम्ही खाताना दिसत असाल तर …

जर तुम्ही स्वप्नात पवनपुत्र हनुमंताचा प्रसाद खात असाल, तर समजायचे की, भविष्यात तुमच्या घरात धान्याची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही कोणतेही काम अडचणीशिवाय करू शकाल. त्याबरोबरच धनसंपत्तीतही वाढ होऊ शकते आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते.

स्वप्नात मारुतीचे रौद्र रूप दिसत असेल तर …

जर स्वप्नात तुम्हाला मारुतीचे रौद्र रूप दिसत असेल, तर त्याचा असा अर्थ आहे की, हनुमंत तुम्हाला तुमच्या चुका स्वीकारण्याची आणि क्षमा मागण्याची संधी देत आहेत. जर तुम्हाला कधी असे स्वप्न पडले, तर दुसऱ्या दिवशी बजरंगबलीच्या मंदिरात जा आणि क्षमा मागा.

हेही वाचा : Astrology : रिलेशनशिपमध्ये खूप प्रामाणिक आणि भावनिक असतात ‘या’ तीन राशीचे लोक; तुमच्या पार्टनरचे नाव यात आहे का?

स्वप्नात हनुमंताचे वानर रूप दिसत असेल तर …

स्वप्नात माकड दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. माकड हे हनुमंताचे रूप आहे. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात माकड दिसणे म्हणजे हनुमंताचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे.

स्वप्नात हनुमानाचे बालरूप दिसले तर …

स्वप्नात हनुमानाचे बालरूप दिसणे चांगल्या गोष्टीचे प्रतीक असते. त्याचा अर्थ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण लवकरच येणार असल्याचे समजावे. हनुमंताचे बालपणीचे रूप दिसल्यानंतर समजावे की, येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader