Fire In Dream: झोपेत लोक अनेकदा स्वप्न पाहतात. अनेक वेळा लोक स्वप्नात रुपया, मंदिर आणि अग्नी पाहतात. प्रत्येक स्वप्नाचा स्वतःचा वेगळा अर्थ असतो. शुभ आणि अशुभ अशा दोन्ही स्वप्नांचे वर्णन स्वप्नशास्त्रात आढळते. स्वप्नात अग्नी दिसल्यास याचा अर्थ काय होतो हे जाणून घ्या.
स्वप्नात घर जळताना पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात तुमचे घर जळताना दिसले तर घाबरू नका, हे स्वप्न शुभ मानले जाते. असं म्हणतात की जर अविवाहित व्यक्तीने हे स्वप्न पाहिलं तर लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. म्हणजे त्याला इच्छित जीवनसाथी मिळेल. दुसरीकडे, जर विवाहित लोकांना हे स्वप्न दिसले तर याचा अर्थ संतती प्राप्ती होऊ शकते.
(हे ही वाचा: Shani Dev: ३० वर्षांनंतर कुंभ राशीत शनि करेल प्रवेश, ‘या’ २ राशींची आर्थिक बाजू होईल मजबूत)
स्वतःला आगीत जळताना पाहणे
जर एखाद्या स्वप्नात तुम्हाला स्वतः तुम्ही आगीत जळताना दिसले तर ते वय वाढवते. याशिवाय माता लक्ष्मीच्या अपार कृपेने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल हेही हे स्वप्न दाखवते. जर तुम्हाला स्वप्नात कोणत्याही प्रकारचा धूर दिसला तर समजून घ्या की आगामी काळात तुम्हाला व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. हे स्वप्न आजारपणाचे देखील सूचित करते आणि तुमचा अपघात होऊ शकतो.
(हे ही वाचा: स्वप्नात ‘या’ ५ गोष्टी दिसणे देतात धन प्राप्तीचे संकेत!)
हवन किंवा पूजेचा अग्नी पाहणे
जर तुम्हाला कुठेतरी पूजा किंवा हवन होताना दिसले किंवा ते स्वतः केले तर तुमचा त्रास लवकरात लवकर दूर होणार आहे. तसेच तुमच्या जीवनात सुख-शांती राहणार आहे.
(हे ही वाचा: Dream Interpretation: स्वप्नात पैसे आणि मंदिर पाहणे शुभ की अशुभ ? जाणून घ्या काय सांगत स्वप्न शास्त्र)
एखाद्या व्यक्तीला आगीत जळताना पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात एखादी व्यक्ती आगीत जळताना दिसली तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. याचा अर्थ व्यवसायात तुमचे नुकसान होणार आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला एखादी वस्तू आगीत जळताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पित्ताशी संबंधित रोग किंवा इतर काही आजार होण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)