Budhaditya Yog 2024: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. याच तिथीला रथ सप्तमी, अचला सप्तमी असेही म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार उद्या बुधादित्य योग, ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ युती होणार आहे. १२ पैकी फक्त ५ राशींचा या शुभ योगात समावेश असेल. या राशींची माहिती येथे आहे.
१. मिथुन
मिथुन राशीच्या जातकांसाठी १६ फेब्रुवारीचा दिवस खूप लाभदायी असणार आहे. माता लक्ष्मीची कृपा होईल. गुंतवणूक करण्यासाठी वेळ खूप चांगली आहे. जोडीदारासह नाते मजबूत होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो.
२. सिंह
सिंह राशीसाठी जातकांना १६ फेब्रुवारीचा दिवस एखादी शुभ वार्ता मिळू शकते. कौटुंबिक संबध मजबूत होतील आणि सुख -शांती मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांसह संबध चांगले असतील आणि सहकार्य मिळेल. व्यापारामध्ये फायदा होऊ शकतो आणि आर्थिक लाभ मिळू शकतो.
हेही वाचा – आनंद आणि सौभाग्य देणारा गुरु ‘या’ राशींच्या लोकांवर करेल कृपा, एप्रिलपर्यंत मिळेल भरपूर संपत्ती
३. तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी रथ सप्तमीचा दिवस खूप चांगला असणार आहे. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणतीही समस्या येत असेल तर ती संपुष्टात येऊ शकते. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला राहील. व्यावसायिकांना फायदा होईल. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
४. मकर
मकर राशीच्या लोकांसाठी बुधदित्या योग अतिशय शुभ असणार आहे. तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असेल ज्यामुळे आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. अभ्यास करणाऱ्या मुलांना अभ्यासात आवड निर्माण होईल आणि निकालही मिळतील.
हेही वाचा – १२ तासानंतर सूर्य कुंभ राशीमध्ये करणार प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ
५. मीन
मीन राशीच्या लोकांसाठी अचला सप्तमीचा दिवस चांगला राहील. उद्या नशीब तुम्हाला साथ देईल. विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या मालमत्तेचे किंवा नवीन कारचे मालक होऊ शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते.