Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार जवळपास १८ वर्षांनंतर कन्या राशीमध्ये मान-सन्मानाचा कारक ग्रह सूर्य, भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि छाया ग्रह केतूचा संयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १८ सप्टेंबर रोजी सूर्य ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. जिथे आधीपासून शुक्र आणि केतू विराजमान आहेत. या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग निर्माण होईल. ज्याचा फायदा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. या राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिग्रही योगाने आयुष्यात येणार सुखाचे क्षण

कन्या

त्रिग्रही योगाच्या प्रभावाने कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. हा संयोग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.शिक्षणातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यात मन रमेल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र. केतू आणि सूर्याची युती सकारात्मक परिणाम देणारी ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बँक बँलन्स वाढेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. अडकलेली कामे पूर्ण होतील.

हेही वाचा: अनंत चतुर्दशीपर्यंत पैसाच पैसा; बाप्पाच्या आशीर्वादाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल

धनु

त्रिग्रही योगाचा धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनेक फळ देणारा ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आनंदी वार्ता कानी पडतील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. या काळात नोकरीत पद-प्रतिष्ठा आणि पगार होईल. करिअरमध्ये चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मन प्रसन्न राहील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the combination of sun venus and ketu in kanya rashi the fortune of these three zodiac signs will shine sap